Ticker

6/recent/ticker-posts

घाटशिळा विद्यालयाच्या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या‌ सुप्त कलागुणांचा विकास! ------------------- शाळा संस्काराच्या केंद्र असतात ----तहसीलदार सुरेश घोळवे ----------------- भाऊ- बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत भूमी ...... रामकृष्ण बांगर

आष्टी (प्रतिनिधी) बलशाली,सक्षम, राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका मौलिक असते. आजचे बालक, युवक,विद्यार्थी हे भविष्यातील राष्ट्राचे नागरिक असून त्यांच्या माध्यमातूनच राष्ट्राचे भविष्य घडते! असे सांगत शाळा या संस्काराच्या केंद्र असतात असे प्रतिपादन तहसीलदार सुरेश घोळवे यांनी केले; तर संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही घाटशिळ पारगाव ची भूमी असल्याचे भावोद्गार सहकार व शिक्षण महर्षी रामकृष्ण बांगर यांनी काढले. घाटशिळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ च्या स्नेहसंमेलन तथा विविध गुण दर्शनाच्या भव्य व्यासपीठावर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामकृष्ण बांगर होते. प्रारंभी संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ. मीरा नवनाथ खेडकर, उपसरपंच उषाताई राजेंद्र खेडकर, केंद्रप्रमुख का. भा. खेडकर, माजी सरपंच वैजनाथ खेडकर, माजी सरपंच कालीदास खेडकर, मुख्याध्यापक सदाशिव खेडकर, टेक महिंद्रा पुणे चे सतीश खेडकर, रामदास मेजर, नारायण घोडके मेजर, माजी पं.स.सदस्य राजेंद्र खेडकर आदी सह मान्यवरांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी श्री गणेशाला वंदन करून महाराष्ट्र गीतापासून अत्यंत उत्स्फूर्तपणे ताल,सुर आणि नृत्यावर गीते सादर केली. उपस्थित रसिक-श्रोत्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये युवा कलावंतांना प्रतिसाद दिला. देश रंगीला, खंडेराया झाली माझी दैना, मुंडे साहेबांची तलवार, दिंडी आणि कीर्तन, आया रे तुफान, शिवगर्जना,स्त्रीभ्रूण हत्या,चला जेजुरीला जाऊ, लाल दिव्याच्या गाडीला, पिचली माझी बांगडी, दैवत छत्रपती, सावित्रीबाई फुले नाटिका..असे एकापेक्षा एक गीते सादर करून अध्यात्म राष्ट्रभक्ती आणि समाज परिवर्तनाची नवी चेतना या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून देण्यात आली.गावकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत चिमुकल्यासह शिक्षकांच्या कौतुक करत रोख बक्षिसांची शाब्बासकी दिली. या सर्व विविध गुण दर्शनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रगती शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. सत्यभामाताई बांगर, विजयसिंह बांगर, मुख्याध्यापक गोपाळघरे, मुख्याध्यापक दिलीप कंठाळे, अशोक साहेब खेडकर,डॉ. तुकाराम नेहरकर,डॉ.बबन नेहरकर,अंकुश खेडकर,संतोष घोडके यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस. सी.वारभुवन, एस.एम.चोले, सी.एम.शिरसाट, प्रा.बटूळे,प्रा.बी.के. मुंडे,डी.एस. तळेकर,अशोक सांगळे,परजणे सर, आर.के.खेडकर, कोकाटे सर,गोरख बांगर,हंगे,पाखरे आदी सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.बिभिषण चाटे आणि प्रा.के. एच.सय्यद यांनी केले. मुख्याध्यापक वारभुवन सर यांनी आभार मानले. चौकट -------- सांस्कृतिक कार्यक्रमातून संस्कार आणि परिवर्तनाचा संदेश! 'घाटशिळा विद्यालयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी घेतलेले परिश्रम हे स्तुत्य असून भविष्यातील हीच पिढी सुसंस्कृत जागृत सक्षम आणि विचारशील घडेल व राष्ट्र संपन्न बनेल!' असा विश्वास यावेळी मानून केंद्राचे केंद्रप्रमुख का.भा.खेडकर यांनी व्यक्त केला. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या