Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमद् भगवद्गीतेचे १८ अध्याय मुखोद्गत केल्याबद्दल सुष्मिता कुलवडे हिस 'गीताव्रती' पदवी प्रदान

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील जळगाव येथील सुष्मिता एकनाथ कुलवडे हिने श्रीमद् भगवद्गीतेचे १८ अध्याय मुखोद्गत केल्याबद्दल तिला 'गीताव्रती'पदवी प्रदान करण्यात आली.सुष्मिता एकनाथ कुलवडे हिचे हे यश कौतुकास्पद आहे.तिने श्रीमद् भगवद्गीतेचे १८ अध्याय पूर्णपणे मुखोद्गत करून'गीताव्रती' ही पदवी संपादन केली आहे.भगवद्गीतेच्या १८ अध्यायांचे पाठांतर करून,सुष्मिताने आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा आणि अथक परिश्रमांचा परिचय दिला आहे.गीताव्रती'ही सन्माननीय पदवी प्राप्त करणे ही सुष्मितासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.केवळ पाठांतरच नव्हे,तर गीतेतील अमूल्य ज्ञान तिने आत्मसात केले आहे.जे तिला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरेल.सुष्मिताचे हे यश अध्यात्म आणि शिक्षण यांचा एक सुंदर संगम आहे. सुस्मिता कुलवडे हिचा जन्म १२ ऑगस्ट १९९९ रोजी जळगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला.तिचे शालेय शिक्षण पहिली ते दहावी पर्यंत जळगाव येथील जय भवानी विद्यालयात झाले. अकरावी ते एम.एस्सी (केमिस्ट्री) पर्यंतचे शिक्षण कडा येथील गांधी महाविद्यालयात झाले.उच्च शिक्षण घेतले असले तरी सुश्मिता कुलवडेला अध्यात्म क्षेत्राची आवड असल्यामुळे तिने ह.भ.प.पांडुरंग महाराज भालके आणि ह.भ.प.पांडुरंग महाराज खोंडे (आळंदी) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद्भागवत गीता केली आहे.जीवनात समाधान,शांती देणारा ग्रंथ आहे असे सुस्मिताचे म्हणणे आहे.प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सुष्मिता हिने मला लहानपणापासून वाचनाची आवड होती.गीता हा ग्रंथ मुखोद्गत करण्याची सद्बुद्धी मिळाली.गीतापाठ झाल्यानंतर युट्युबवर गिता परिवाराचा व्हिडिओ पाहून गिता परिवारामध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिली आहे.ही परीक्षा विशेष प्राविण्यासह मी उत्तीर्ण झाले आहे असे सांगितले.मी पाचवीमध्ये शिकत असताना गीता हातामध्ये घेतली शालेय शिक्षणानंतर श्री भगवती ज्ञानेश्वरी लिहिण्याची सद्बुद्धी आली. हस्तलिखित ज्ञानेश्वरी ह.भ.प.पांडुरंग महाराज खोंडे (आळंदी देवाची),साधक
हृदय सम्राट ह.भ.प.श्री नारायण महाराज जाधव (डॉ बाबा) यांच्याकडे सुपूर्त केली आहे असेही सुश्मिताने सांगितले.सुस्मिता कुलवडे हिच्या या यशाबद्दल आ.सुरेश धस,माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर माजी आ.बाळासाहेब आजबे,ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल, पांडुरंग महाराज भालके,पांडुरंग महाराज खोंडे,संतोष महाराज मोरे,दादा महाराज चांगुणे,निळकंठ महाराज तावरे आदींनी अभिनंदन केले आहे. --------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या