

आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात आष्टी ते दिल्ली शेतकऱ्यांचा पायी मोर्चा नेणारे शेतकरी नेते म्हणून महाराष्ट्रात इतिहास निर्माण करणारे माजी आ.भीमराव धोंडे यांनी महेश सहकारी साखर कारखाना २०२६-२७ च्या हंगामात सुरू होणार असल्याची माहिती बोलताना दिली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉ.अजय धोंडे, अभय धोंडे,चेअरमन राजेंद्र धोंडे,नियामत बेग
,हनुमंत थोरवे,अशोक साळवे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,राजाराम नन्नवरे,बबन औटे,हरिभाऊ जंजिरे,सोनाजी गांजुरे,बाबासाहेब आंधळे,विठ्ठल लांडगे,पांडुरंग गावडे,शहादेव गर्जे,नानाभाऊ वाडेकर,
अंकुश मुंडे,बजरंग कर्डिले,बाळासाहेब भुकन,सरपंच दादा जगताप,संदीप आंधळे,सुनील शिंदे,अमोल दातीर,
कुंडलिक आस्वर,पत्रकार संजय खंडागळे,पत्रकार संतोष नागरगोजे,पत्रकार अक्षय विधाते,शरद गर्जे,कार्यकारी संचालक,संचालक व कारखान्याचे सर्व अधिकारी,
कर्मचारी,कामगार उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.भीमराव धोंडे म्हणाले की, कारखाना अनेक वर्षापासून बंद असल्याने बरेच काम करणे आहे. सहा सात महिन्यांचा कालावधी आहे.या कालावधीमध्ये काम पूर्ण करून पुढील गळीत हंगामामध्ये कारखाना सुरू करणार आहोत.आपल्याला जर लायसन नसतं मिळालं तर हा कारखाना भंगारात विकावा लागला असता काही लोकांचा तसा डाव होता.आपण सर्व जण मिळुन कारखाना सुरू करणार आहोत.हि वास्तु आपल्याला टिकवून ठेवायची आहे.आपण कारखान्यासाठी मोर्चा काढला यासाठी शेतकरी बांधवांनी उसाच्या आता नवीन २५ जातीचे नवीण वाण आले असून आम्ही लखनऊ वरून ७३१८१ जातीचा नमुना त्या ऊसाची एव्हरेज १०० टन प्रती एकर आहे.लखनऊ चे क्लीन कमिशनर यांना विनंती केली आहे.प्रायोगिक तत्त्वावरती रोपे किंवा बेणे देण्याची मागणी केली आहे.मिळून जातील ऊसाची लागवड शेतकरी बांधवांनी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे असे आवाहन केले तालुक्यातील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. कारखाना परिसरात श्रीफळ वाढवून विधिवत पूजन करून नव्या सुरुवातीची घोषणा करण्यात आली.वेदमंत्रांच्या उच्चारात पूजा करण्यात आली आणि कारखाना लवकरच सुरू होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, कारखाना सुरू झाल्यास परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळे.स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.अनेक वर्षांपासून बंद असल्याने परिसराच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता.आता नव्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून कारखाना पुन्हा कार्यरत करण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत.शेतकरी व नागरिकांनीही कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली असून या पूजन सोहळ्यामुळे परिसरात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.या कार्यक्रमास कार्यकारी संचालक व कारखान्याचे सर्व अधिकारी,कर्मचारी,कामगार बांधव मोठ्या उपस्थित होते.
-------------
0 टिप्पण्या