



आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा. शिवदास विधाते यांचे सुपुत्र आणि कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांचे पुतणे
डॉ.विक्रांत विधाते यांची मुंबई येथील के.बी.भाभा हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जरी (डीएनबी) साठी निवड झाली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल माजी आ.भीमराव धोंडे यांनी सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते लालाभाऊ कुमकर,राजेंद्र धोंडे,अजय धोंडे, अभय धोंडे,डॉ. डी.बी.राऊत,संजय शेंडे,संदीप नन्नवरे, प्राचार्य सुनील कोल्हे,इंजि. बाळासाहेब भुकन, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्राचार्य डॉ. चंद्रकांत गोसावी, शिवाजी टेकाडे,प्रा. आर.जी.विधाते, सुदर्शन धोंडे, माऊली बोडखे, प्राचार्य डॉ.श्रीराम आरसूळ,प्राचार्य संजय बोडखे, सेवानिवृत्त प्राचार्य अशोक टेकाडे, शिवशंकर टेकाडे, प्रा.अशोक खेडकर, रमेश गिरी,सुभाष वाघ,प्रा.राम बनसोडे,उद्धव विधाते,भगवान विधाते,विश्वजीत विधाते,डॉ. सत्यजित विधाते, अजिंक्य विधाते, अशोक विधाते, नवनाथ विधाते, पोपट वाळके, आदीनी अभिनंदन केले.डॉ.विक्रांत विधाते यांनी
ग्रॕड मेडिकल मुंबई येथील मेडिकल कॉलेजमधून
एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. एमबीबीएसच्या अंतीम वर्षात विशेष प्राविण्यासह यश मिळविले होते.डाॕ.विक्रांतचे प्राथमिक शिक्षण आष्टी येथील गंगुबाई आनंदराव धोंडे प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण आष्टी येथील पं.नेहरु विद्यालयात झाले.लातुर येथील शाहु महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण झाले.२०१८ मध्ये झालेल्या नीट परीक्षेत बीड व लातूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. मराठवाडा विभागात विक्रांत द्वितीय आला होता.
0 टिप्पण्या