Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थिनींचे शिक्षण म्हणजे समाजाच्या प्रगतीचा पाया ..... आ.सुरेश धस .......... परिवंत गायकवाड यांच्या पुढाकारातून कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना गणवेश-साहित्य वाटप

आष्टी (प्रतिनिधी ) समाजातील वंचित,गरजू व होतकरू विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे हीच खरी समाजसेवा असल्याचा प्रेरणादायी आदर्श क-हेवडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते परिवंत गायकवाड यांनी पुन्हा एकदा कृतीतून दाखवून दिला.आष्टी,पाटोदा व शिरूर मतदार संघाचे लोकनेते तथा मराठवाडा भूषण आ.सुरेश अण्णा धस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथील पीएम श्री जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी गणवेश व शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला.शनिवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजनने करण्यात आली.यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थिनींना गणवेश,रिबीन जोडी व पेनचे वाटप करण्यात आले.विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधानाचा भाव कार्यक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आबासाहेब खताळ यांनी करताना शाळेची शैक्षणिक परंपरा,विद्यार्थिनींची संख्या व शैक्षणिक प्रगती याबाबत माहिती दिली.ग्रामीण भागातील अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे आवश्यक शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहतात,मात्र अशा उपक्रमांमुळे त्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतात,असे त्यांनी सांगितले. परिवंत गायकवाड यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना,समाजाने एकत्र येऊन विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगत आमचे दैवत, लोकनेते,मराठवाडा भूषण आमदार तथा माजी मंत्री सुरेश आण्णा धस हे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या या छोट्या कार्यक्रमाला वेळ देऊन उपस्थित राहिले.आमच्या गायकवाड परिवाराच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना शालेय गणवेश आणि शालेय साहित्य वाटप करण्यासाठी ते उपस्थित राहिलेबद्दल आभार व्यक्त करीत आहे. बीड जिल्ह्यामध्ये परळी या शहरात आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत असताना अण्णा परळीच्या कार्यक्रमाला जाणे आवश्यक असताना देखील ते आमच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्या कार्यक्रम उपस्थित राहिले. त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देत आहोत.त्यांचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो असे सांगितले. विद्यार्थिनींशी संवाद साधताना आ.सुरेश धस म्हणाले की,बीड जिल्ह्यात सुमारे हजाराहून अधिक पटसंख्या असलेली ही कन्या शाळा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा अभिमान आहे.ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना कोणत्याही कारणामुळे शिक्षणापासून दूर जावे लागू नये यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.मुलगी शिकली तर कुटुंब,समाज आणि राष्ट्र प्रगत होते; म्हणूनच विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी कवी प्रा.सय्यद अल्लाऊद्दीन यांच्या " बाप पिकवितो घास,त्याला गळफास " या बालनाटकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आ. धस यांच्या हस्ते करण्यात आले.विशेष म्हणजे या नाटकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशनही २००६ साली त्यांच्या हस्तेच झाले होते. वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनींना गणवेश, वह्या,पुस्तके यांचा अभाव भासतो,त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊन आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते.ही बाब लक्षात घेऊन परिवंत गायकवाड यांनी स्वतः पुढाकार घेत विद्यार्थिनींना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला नवे बळ मिळणार असून शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होणार आहे.परिवंत गायकवाड हे केवळ उद्योजक नसून सामाजिक जाणीव असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. जयदीप कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण,आरोग्य,धार्मिक व सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवून गरजू घटकांना मदतीचा हात दिला आहे.त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे ते समाजात विश्वासार्ह व प्रेरणादायी सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क-हेवडगावच्या सरपंच तथा कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ.वंदना परिवंत गायकवाड होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रा.सय्यद अल्लाऊद्दीन,दत्ताभाऊ काकडे,रंगनाथ धोंडे, अरुणभैय्या निकाळजे,गणेशनाना शिंदे,सुरेश वारुंगुळे,सादिक कुरेशी,अशोक मुळे, सुरेश पवार,उत्तम बोडखे,अविनाश कदम,शरद रेडेकर,अविशांत कुमकर,मिलिंद निकाळजे,जयदीप गायकवाड,दीपक निकाळजे,रुपेश निकाळजे,राजू निकाळजे,दिलीप राऊत,आशोक पोकळे, शिवलिंग लगड,आण्णासाहेब साबळे,राजेंद्र बोराडे,मनोज धनवडे,कपिल अग्रवाल यांसह शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुजाता झगडे,उपाध्यक्षा श्रीमती प्रभा वायकर,सदस्या श्रीमती विद्या डोंगरदिवे,श्रीमती जयश्री धोंडे, श्रीमती उज्वला धोत्रे, श्रीमती अनिता लांबडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास मुख्याध्यापक आबासाहेब खताळ,सतीश दळवी यांच्यासह शिक्षकवृंद,पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांनी केले तर आभार देविदास शिंदे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या