Ticker

6/recent/ticker-posts

घाटशिळा विद्यालयात राष्ट्रीय युवा दिन आणि जिजाऊ जयंती साजरी

आष्टी (प्रतिनिधी) घाटशिळा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिन तसेच राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, सावित्रीबाई फुले जयंती व संविधान दिन उत्साहात साजरी करण्यात आला.प्रारंभी स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता जिजाऊ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एम.चोले होते; तर व्यासपीठावर सी.एम.शिरसाट, सांगळे,कोकाटे सर आदी सह मान्यवर उपस्थित होते.यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अध्यक्ष व प्राचार्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. चैतन्य खेडकर या विद्यार्थ्यांने आपल्या भाषणातून जिजाऊ आणि विवेकानंदांच्या कार्यावर प्रकाश टाकला.यावेळी प्राचार्य एस. सी.वारभुवन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकारी शिक्षक बांधव व विद्यार्थ्यांच्या वतीने अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी प्राचार्य एस.सी.वारभुवन यांनी सत्काराला उत्तर देताना जिजाऊ आणि विवेकानंदांच्या कर्तुत्वाचा वेध घेतला,व सत्कारा बद्दल धन्यवाद मानले. अध्यक्षीय भाषणात एस.एम. चोले यांनी जिजाऊंचे कर्तुत्व महान आहे तर स्वामी विवेकानंदांनी युवकांना दिलेली विचारांची देन कायम प्रेरणा दायी राहील असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रा.बी.के.मुंडे, प्रा.के.एच.सय्यद, परजने सर, सर,एन.एस. सानप,आर.के.खेडकर, जी.एम.बांगर,हांगे मामा, पाखरे मामा आदी सह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.प्रस्ताविक प्रा.एस.ए.बटूळे यांनी; तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.बिभिषण चाटे यांनी केले.डी.एस.तळेकर यांनी आभार मानले. ----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या