राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचे साधन नसून ते समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम
आहे.याच तत्वाला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणाऱ्या सौ.प्राजक्ता सुरेश धस या केवळ
एका आमदाराच्या पत्नी नसून त्या स्वतःच्या स्वतंत्र विचारसरणीने, कर्तृत्वाने आणि
सामाजिक बांधिलकीने परिपूर्ण असलेल्या एक नेतृत्व आहे.पती आ.सुरेश धस हे स्वतः एक
यशस्वी नेते आहेत. आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदार संघातून पाच वेळा आमदार
म्हणून निवडून आलेले आहेत.त्यांच्या राजकीय प्रवासात सौ.प्राजक्ता धस यांचे योगदान
मोठे आहे. सौ.प्राजक्ता धस यांना समाजातील महिलांची स्थिती बदलण्याचे मोठे काम केले
आहे.त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी अनेक स्वावलंबी योजना अमलात आणल्या
आहेत.महिला बचतगटांना प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी मदत करणे, त्यांना
आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे यासाठी त्यांनी विशेष उपक्रम हाती घेतलले आहेत. अनेक
गावांमध्ये त्यांनी महिलांसाठी बचत गट स्थापन करून औद्योगिक वाटचालीला चालना देली
आहे.ग्रामीण भागातील बेरोजगारी हटवण्यासाठी सौ.प्राजक्ता धस यांनी सूक्ष्म,लघु आणि
मध्यम उद्योगांना चालना देण्यावर भर दिला आहे.त्यांच्या प्रयत्नांमुळे मतदार संघात
नवीन औद्योगिक वसाहती उभ्या राहत आहेत. त्यांचं धोरण हे ‘स्थानीय संसाधनांचा वापर,
स्थानिकांसाठी रोजगार’ यावर आधारित आहे.सामाजिक सलोखा,जातीय समरसता व एकात्मता ही
त्यांच्या कार्यपद्धतीची खासीयत आहे. त्यांनी अनेक सामाजिक व सांस्कृतिक
कार्यक्रमांचे आयोजन करून जसे की, रक्षाबंधनावेळी इतर मागास व अनुसूचित जमातीच्या
लोकांना एकत्र करत विविध जाती-धर्मांमधील संवाद वाढवला आहे.अशा उपक्रमातून त्यांनी
लोकांमध्ये परस्पर विश्वास निर्माण केला.
नेतृत्व आणि निर्णयक्षमतेचा संगम
-----------------------
सौ.प्राजक्ता धस यांची प्रशासकीय समज,धोरणात्मक विचार आणि
परिस्थितीचे बारकाईने आकलन यामुळे त्यांचं नेतृत्व कुशल ठरत आहे. कोणत्याही
अडचणीच्या क्षणी त्यांनी घेतलेले निर्णय अचूक आणि दूरगामी परिणाम करणारे ठरले
आहेत.त्यांनी अनेक विकास कामात जसे की, दूध संघ असेल रासायनिक व ऑरगॅनिक खताच्या
कंपनीचे रचनात्मक बांधणी असेल अशा नियोजनबद्ध कामकाजाची शिस्त लावली आहे.राजकीय व
सामाजिक क्षेत्रात पारदर्शकता हे अत्यंत आवश्यक मूल्य आहे. सौ.प्राजक्ता धस यांनी
या बाबतीत एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या संकल्पनांमध्ये सरकारी निधींच्या
वापराबाबत जनतेला माहिती देणे,अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग घेणे याला
प्राधान्य दिलं जातं. दुग्ध व्यवसाय ही केवळ शेतीपूरक आर्थिक क्रिया नसून, ती
ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठा आत्मनिर्भरतेचा मार्ग बनू शकते, हे सौ.प्राजक्ता
धस यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केलं आहे.महाराष्ट्र शासनाच्या महानंद दूध डेरीचे
संचालक पद ही बराच वर्ष त्यांनी भूषवले 'दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण','दुग्ध संकलन
केंद्र' अशा अनेक प्रकल्पांची सुरुवात केली आहे. कृषी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा
कणा आहे. सौ.प्राजक्ता धस यांना याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे त्यांनी
शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती,ठिबक सिंचन, ड्रोनद्वारे खतफवारणी यांसारख्या आधुनिक
तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित केलं. PM Biotech सारख्या नामांकित
ऑरगॅनिक कंपनीची स्थापना केली, गाव - एक कृषी विशेषता' हे धोरण राबवून गावागावात
विशिष्ट उत्पादनांवर लक्ष केंद्रित केल.पशुसंवर्धन हे केवळ दुधापुरते मर्यादित
नाही, तर ते संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकते. प्राजक्ता धस यांनी
पशुधन आरोग्य,कृत्रिम रेतन , पशु आरोग्य अशा उपक्रमांद्वारे या क्षेत्रात मोठं
योगदान दिलं आहे. त्यांनी स्थानिक पशुधन पालन करणाऱ्या लोकांना संघटित करून सहकारी
संस्थांची स्थापना केली आहे.प्रशासन हे जनतेसाठी कार्य करावे, ही त्यांची स्पष्ट
भूमिका आहे. त्यांनी अनेक वेळा प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठवून
जनतेचा आवाज बुलंद केला आहे. सार्वजनिक कामांमध्ये वेळेवर अंमलबजावणी,दर्जा आणि
खर्चाचे पारदर्शक ऑडिट होण्यासाठी त्यांनी स्थानिक नागरिक बळ दिल्याचे दिसून येते.
सौ.प्राजक्ता धस यांच्या निर्णय प्रक्रियेत भावनांपेक्षा वस्तुनिष्ठता आणि
भविष्याचा विचार असतो.गावांतील विविध समस्या सोडवताना त्यांनी सर्व संबंधित घटकांचे
म्हणणे ऐकून सर्वसमावेशक निर्णय घेतले. त्यांची निर्णयशक्ती ही त्यांना एक
दूरदृष्टीसंपन्न नेत्या बनवते. कार्यक्रम असो की योजना – यामध्ये नियोजन हाच यशाचा
पाया असतो. प्राजक्ता धस या अत्यंत नियोजनबद्ध कार्यप्रणालीसाठी ओळखल्या
जातात.त्यांनी जलसंधारण प्रकल्प, रस्ते विकास, महिला बचत गटांचे सशक्तीकरण अशा अनेक
उपक्रमांत एक उत्तम आराखडा तयार करून यशस्वी अंमलबजावणी केली आहे. शिक्षण हा समाज
परिवर्तनाचा खरा मार्ग आहे, यावर सौ. प्राजक्ता धस यांचा दृढ विश्वास आहे. त्यांनी
शाळांची उभारणी, डिजिटल लायब्ररी, मुलींना शिक्षणात प्राधान्य शिक्षक प्रशिक्षण
शिबिरे आयोजित केली आहेत. सौ.प्राजक्ता सुरेश धस यांचं कार्य केवळ त्यांच्या मतदार
संघापुरतं मर्यादित नाही तर ते एक प्रेरणादायी मॉडेल आहे. राजकारणाला सामाजिक
बांधिलकीची दिशा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वात लोकांना सुरक्षितता,विश्वास आणि
प्रगतीचा मार्ग सापडतो.महिला सक्षमीकरण,कृषी व औद्योगिक विकास, सामाजिक सलोखा आणि
पारदर्शक कारभार यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांत त्यांनी दिलेलं योगदान दीर्घकाळ
स्मरणात राहील.
-- ले ख क




हनुमंत गावडे
---------------------------
0 टिप्पण्या