आष्टी (प्रतिनिधी ) परिश्रमपूर्वक प्रयत्न करून देवाची प्रार्थना केल्यास ती सफल
होत असते. भक्त हा आळशी असेल तर मनुष्याची प्रार्थना सफल होत नाही. देवाची भक्ती
म्हणजे परम पुरुषार्थ होय.आपल्या सर्व संतांनी पराकोटीचे प्रयत्न करून देवाची
प्रार्थना केल्यामुळे ते सफल झाले आहेत.त्यामुळे प्रयत्नपूर्वक देवाची प्रार्थना
करणे आणि फलप्राप्तीसाठी धैर्यपूर्वक वाट पाहणे ही जी मानवी जीवनाच्या यशस्वीतेची
त्रिसूत्री आहे.मनुष्य जेव्हा एखाद्या कार्याची सुरुवात करतो त्यावेळी त्या
कार्याच्या यशासाठी तो देवाची प्रार्थना करतो.कामाची फलप्राप्ती म्हणजे केलेल्या
कर्माचे अपेक्षित फळ मिळणे होय. भारतीय संस्कृतीमध्ये फलप्राप्तीसाठी देवाची
प्रार्थना करणे ही श्रद्धा विश्वास आणि आत्मिक बळ यांची अभिव्यक्ती मानली जाते.या
देवाच्या प्रार्थनेमुळे मनाला शांतता मिळते.कार्य करताना येणारा ताण भीती आणि शंका
कमी होतात. सकारात्मक विचार वाढल्यामुळे व्यक्ती अधिक आत्म विश्वासाने काम करू
शकते.श्रद्धा आणि आत्मविश्वास याबाबत विचार करता देवावर विश्वास ठेवल्यामुळे आपण
एकटे नाही अशी भावना निर्माण होते. प्रयत्न,देवाची प्रार्थना आणि श्रद्धा माणसाला
चिकाटीने प्रयत्न करण्यास प्रेरणा देते असे प्रतिपादन महंत मंदार महाराज रामदासी
यांचे आष्टी शहरात आयोजित संगीत रामकथेतुन केले. आष्टी येथील आ. सुरेश धस यांचे
वतीने आयोजित श्रीराम कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यातील तिसऱ्या दिवशी कथा निरूपण करताना
ते बोलत होते.पुढे बोलताना महंत मंदार महाराज रामदासी म्हणाले की,श्रद्धा आणि
आत्मविश्वास याबाबत विचार करता देवावर विश्वास ठेवल्यामुळे आपण एकटे नाही अशी भावना
निर्माण होते आणि ही श्रद्धा व्यक्तीला चिकाटीने प्रयत्न करण्यास प्रेरणा देते
त्यामुळे अधिक चांगली फलप्राप्ती होत असते.मानवाचे कर्म देखील चांगले असावे चांगले
कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही फक्त प्रार्थना करून फलप्राप्ती होत नसते तर
प्रार्थना ही कर्माला दिशा देणारी शक्ती असून प्रार्थनेमुळे व्यक्तीमध्ये संयम आणि
सहनशीलता त्याचबरोबर नैतिक मूल्य विकसित होत असतात. चिकाटीने प्रयत्न केल्यास फळ
उशिरा मिळाले तरी निराश न होता मानवी जीवनाची वाटचाल स्वीकार होत असते असे सांगून
ते पुढे म्हणाले की,फलप्राप्तीसाठी देवाची प्रार्थना करणे म्हणजे फक्त
इच्छापूर्तीची मागणी नव्हे तर मनाची तयारी आणि आत्मविश्वासाची वृद्धी आणि कर्माला
योग्य दिशा देणे होय त्यासाठी प्रार्थना आणि प्रयत्न याचा योग्य समन्वय असण्याची
आवश्यकता आहे असे सांगत ते म्हणाले की,सज्जन व्यक्ती या उपासना करत नाहीत मात्र
दुर्जन व्यक्ती या उपासना करून सशक्त बनतात उपासना ही अत्यंत महत्त्वाची असून रावण
देखील दुर्जन समजला जातो परंतु त्याने केलेल्या शिवभक्तीमुळे उपासनेमुळे रावण हा
बलशाली समजला जात होता याचा अर्थ सज्जन व्यक्तीने उपासना करून बलशाली व्हावे.असाही
संदेश त्यांनी शेवटी दिला. संगीत श्रीराम कथा सोहळ्यामध्ये आज तिसऱ्या दिवशी प्रभू
श्री रामचंद्राचा जन्मदिन सोहळा संगीतमय वातावरणात आणि उपस्थित महिला वर्गांनी
अत्यंत उत्साहाने भक्तीपूर्ण वातावरणामध्ये पार पडला दैनंदिन नित्य प्रथेनुसार
प्रवचनकार कीर्तनकार या संतांचे पूजन करण्यात आले आजचा या संत पुजनाचा मान सरपंच
परिषदेला देण्यात आला होता. आष्टी तालुकाध्यक्ष सुधीर पठाडे आणि त्यांच्या
सहकाऱ्यांनी या संतांचे पूजन केले.यावेळी प्राजक्ताताई धस, आहदिकाताई लोखंडे,विद्या
चव्हाण,ताराबाई थोरवे,अनिता चौधरी,सुनिता सायंबर, मंदाकिनी मस्के,सागरआप्पा
धस,सुधीर पठाडे, नामदेव राऊत, नामदेव विधाते, किशोरमामा झरेकर, अजित मुळे,कपिल
अग्रवाल, उत्तम बोडखे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे, राजेंद्र दहातोंडे, श्रीहरी पुरी
महाराज,रामदास डोरले महाराज, तुकाराम भोसले महाराज,अशोक भोसले महाराज, आजबे महाराज,
कोकणे महाराज, भालेराव महाराज आदि राजकीय, सामाजिक,धार्मिक, क्षेत्रातील मान्यवर
उपस्थित होते.



-----------------
0 टिप्पण्या