आष्टी(प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या सोमवारी संपन्न झालेल्या ६६ व्या. दीक्षांत समारंभामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते आणि विशेष अतिथी संचालक भारतीय विज्ञान शिक्षण संस्था आणि संशोधन संस्था पुणे, डॉ.सुनील भागवत, प्र. कुलगुरू प्रोफेसर वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर आदीसह मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. आशा फड-चाटे यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.नरेंद्र काळे,विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. सुधाकर चव्हाण, सिनेट सदस्य डॉ.आनंद वाघ, डॉ. गौतम घाडगे,डॉ. विकास गवई यांच्यासह शिक्षण संस्कृती आदी सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत वरिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रोफेसर डॉ. रामकिसन मुंडे, ज्येष्ठ प्रोफेसर आणि हिंदी भाषा अभ्यासक डॉ.प्रो. मोहसीन शेख यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन डॉ.आशा फड यांचा सन्मान करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
-------------------
0 टिप्पण्या