Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी येथे ११ ते १७ जानेवारी दरम्यान संगीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन

आष्टी (प्रतिनिधी) आ.सुरेश धस प्रतिष्ठानाच्या वतीने आष्टी येथे दि.११ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत संगीत श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा होत आहे.या श्रीराम कथेचे निरूपण देवदास स्वामी मठ,दादेगाव येथील परमपूजनीय महंत मंदार महाराज रामदासी हे करणार आहेत.आष्टी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न होणार आहे. दि. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी १२.३० ते सायंकाळी ४ या वेळेत श्रीराम कथा होणार आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारीरोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत विशेष राम कथा होणार आहे.या भव्य दिव्य सोहळ्याच्या प्रारंभाच्या पूर्वसंध्येला आकर्षक शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच दररोज प्रभू श्रीराम आरती, संत पूजन व भाविकांसाठी प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.या श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून भक्ती,संस्कार आणि अध्यात्माचा प्रसार होणार आहे.आष्टी परिसरातील २० ते २५ गावांतील भाविकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.यावेळी आमदार सुरेश धस यांनी हा सोहळा प्रत्येक रामभक्तासाठी आध्यात्मिक पर्वणी आहे. सर्व भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून श्रीराम कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या