Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष सानप, सचिवपदी प्रा.डॉ.विनोद ढोबळे यांची अविरोध निवड

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुका पत्रकार संघाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संघाच्या अध्यक्षपदी कार्यक्षम लोकाशाचे तालुका प्रतिनिधी संतोष सानप तर सामनाचे तालुका प्रतिनिधी प्रा.डॉ.विनोद ढोबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी भीमराव गुरव तर उपाध्यक्षपदी शरद रेडेकर आणि मनोज पोकळे या दोघांची निवड करण्यात आली. दर्पण दिनानिमित्त मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार भवन येथे आष्टी तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांची बैठक पार पडली.ही बैठक ज्येष्ठ पत्रकार सिताराम पोकळे व प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत संघाच्या आगामी वाटचाली संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.२० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय असलेले आणि संघाच्या कायम हिताचा विचार करणारे संतोष सानप यांच्या कार्याची दखल घेत त्यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष- शरद रेडेकर, मनोज पोकळे,सचिव -विनोद ढोबळे कार्याध्यक्ष- भीमराव गुरव यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. पत्रकारितेतील मूल्ये जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सिताराम पोकळे,उत्तम बोडखे, दत्ताभाऊ काकडे,प्रविण पोकळे,रघुनाथ कर्डिले,शरद तळेकर,सचिन रानडे,गणेश दळवी यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.नव्या नेतृत्वाखाली आष्टी तालुका पत्रकार संघ अधिक सक्षमपणे कार्य करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पत्रकार संघाच्या वतीने शाल फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या