Ticker

6/recent/ticker-posts

माजी आ.भीमराव धोंडे यांनी रामकथेचे केले श्रवण; कथा निरूपणकार ह.भ.प.मंदार महाराजांच्या कौशल्याचे कौतुक!

आष्टी (प्रतिनिधी) अध्यात्म हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मनुष्याच्या अंतिम समाधानासाठी धार्मिक कार्यक्रमात सहभाग आवश्यक असून त्यातून मिळणारे समाधान हे अंतिम असते असे उद्गार आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघाचे माजी आ. भीमराव धोंडे यांनी काढले. दरम्यान,धार्मिक कार्यात निसंकोचपणे सर्वांनी उपस्थित राहून धर्म वाढवण्यासाठी सर्वोतोपरी सहभागी व्हावे असे आवाहनही माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले. आष्टी येथे आ.सुरेश धस आणि संयोजन समितीच्या वतीने संगीत रामकथा निरूपणकार मंदार महाराज रामदासी यांच्या कथेच्या आयोजन करण्यात आले आहे.माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी शहरात श्रीराम कथेच्या मंडपामध्ये आज आवर्जून उपस्थिती लावली.रामकथेत पाचव्या दिवशी माजी आ.भीमराव धोंडे यांनी भेट देऊन संगीत रामकथा निरूपणकार मंदार महाराज रामदासी यांच्या कथा निरुपणाच्या कौशल्याचे मन भरून कौतुक केले आणि या कथा आयोजकांचेही अभिनंदन केले.धार्मिक कार्यात्मिक संकोचपणे धर्म वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असतो.सर्व नागरिकांनी आणि भाविक भक्तांनीही अशा धार्मिक उपक्रमात सहभागी झाले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या संगीत राम कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मानवी जीवनामध्ये सत्य,संयम,कष्ट, परिश्रम माणुसकी, मानवता, एकोपा, ऐक्य आणि सर्वधर्मसमभाव ही मूल्य मौल्यवान असतात.या मूल्याला अधोरेखित करण्याचे काम अर्थातच धर्म करीत असतो.त्या अनुषंगाने मानवता वादाचा सर्वांनी पुरस्कार करून अशा कथा निरूपणाला आवर्जून उपस्थित राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी सौ प्राजक्ताताई धस, शैलजा थोरवे, सुखलाल मुथा, दिनकरराव तांदळे, अशोकदेवा जोशी, माजी सरपंच नामदेव राऊत,डॉ. मधुकर हंबर्डे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,उत्तम बोडखे,प्रवीण पोकळे,सचिन रानडे,शरद रेडेकर, हौसराव आजबे, सतीशशेठ धस आदि सामाजिक, राजकीय,धार्मिक, क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकट
-------- कथाकार ह.भ.प. मंदार महाराजांच्या पवित्रवाणीचा सुगंध दरवळला! ----------------- आपल्या पवित्रवाणीतून आणि केलेल्या अभ्यासातून रामायणातील अनेक प्रसंग साक्षात जिवंत करण्याचे हातोटी आणि कौशल्य ह.भ.प.मंदार महाराज रामदासी यांना लाभलेले आहे. त्यांच्या वाणीतून अनेक भाविक भक्तांमध्ये अध्यात्म समर्पणाचा भाव निर्माण होण्याची प्रेरणा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करत ह.भ.प.मंदार महाराज यांच्या कथा निरूपण कौशल्याचे मनापासून माजी आ.भीमराव धोंडे यांनी कौतुक केले आणि आयोजकांनाही धन्यवाद दिले. ----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या