Ticker

6/recent/ticker-posts

आजींना पाहताच 'त्यांच्या' डोळ्यात कृतज्ञेचा भाव दाटून आला! ---------------- ह.भ.प.मंदार महाराजांच्या रामकथे दरम्यान हृदयस्पर्शी प्रसंग

आष्टी (प्रतिनिधी ) माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपल्या मातीशी, जन्मभूमीशी आणि नात्याशी दुरावा केला नाही पाहिजे. याचीच अनुभूती आज आष्टी शहरामध्ये एक आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज राम कथाकार आणि त्यांच्या आजीच्या संदर्भात घडलेल्या अत्यंत संवेदनशील आणि हृदयस्पर्शी प्रसंगाने पाहायला मिळाली. त्याचे झाले असे की, सुप्रसिद्ध रामकथाकार मंदार महाराज रामदासी यांच्या राम कथेचा कार्यक्रम आष्टीत सुरू होता व्यासपीठावर महाराज कथेचे निरूपण करण्याच्या दरम्यान आष्टी तालुक्यातील त्यांच्या गावच्या आजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी व्यासपीठाजवळ आल्या हे पाहताना महाराजांनी आवर्जून आजीबाईंना जवळून संवाद साधला आणि तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो असल्याची भावना व्यक्त करत आपला साधेपणा यातून व्यक्त केला.ज्या गावात बालपण गेलं, ज्या मातीत खेळत मोठं झालो,त्याच गावातील एक वृद्ध आजी आपल्या नातवाचं कौतुक पाहण्यासाठी टाकळसिंगहून थेट आष्टीत येतात. व्यासपीठावर रामकथेचा गजर करणारे कथाकार मंदार महाराज रामदासी आज त्या आजीचे नातू.पण त्यांच्या यशाने त्यांच्यात गर्व नाही; उलट आजीला पाहताच त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञता आणि ओलावा दाटतो.सर्वांच्या साक्षीने ते आजीच्या चरणांशी नतमस्तक होतात,प्रेमाने भेट घेतात आणि मनापासून आशीर्वाद स्वीकारतात. त्या क्षणी कथाकार नाही,कीर्ती नाही असतो फक्त आजीचा लाडका नातू.हा प्रसंग आपल्याला शिकवतो की, माणसाची खरी उंची ही पद,प्रसिद्धी किंवा व्यासपीठाने मोजली जात नाही; तर तो आपल्या मुळांशी किती प्रामाणिक राहतो यावर ठरते हे या निमित्ताने स्पष्ट झाले. - -----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या