
आष्टी (प्रतिनिधी)
लक्ष्मण हे सद्गुणाचे केंद्र असून त्यांचा शेषाचा उतार आहे.
रामचंद्राची कीर्ती ध्वजाप्रमाणे असून त्या काठीचा दंड म्हणजे लक्ष्मण आहे असे भाव
व्यक्त करत त्या चारही भावंडांमध्ये मतभेद होते परंतु मनभेद नव्हते असे मौलिक विचार
ज्येष्ठ राम कथाकार ह.भ.पं.मंदार महाराज रामदासी यांनी व्यक्त केले. आष्टी येथील आ.
सुरेश धस यांचे वतीने आयोजित श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये चौथ्या दिवशीचे
निरूपण करताना ते बोलत होते.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,सौ. प्राजक्ताताई सुरेश
धस,जयदत्त सुरेश धस,ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे, सुखलाल मुथा,डॉ. मधुकर
हंबर्डे,पांडुरंग बळे, नामदेव राऊत, पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार प्रफुल्ल
सहस्रबुद्धे, सचिन रानडे, शैलजा थोरवे, सुनिता सायंबर, सुनिता उगले, अनिता चौधरी,
किशोरमामा झरेकर, बंडुआबा आजबे, गौतम आजबे यांचेसह अनेक प्रवचनकार,
कीर्तनकार,संतमहंत उपस्थित होते. ह.भ.प.मंदार महाराज राम कथेचे पुष्पगुंपताना अनेक
आध्यात्मिक विचारांच्या मालिकेतील दृष्टांत व्यक्त करत होते. यावेळी उपस्थित
तालुक्यासह विविध भागातून आलेल्या भाविक भक्तांमध्ये चैतन्यमय वातावरणाचा सुगंध
दरवळत होता.ह.भ.प.मंदार महाराज पुढे म्हणाले की, शत्रुघ्न यांची विशेष वैशिष्ट्य
आहे त्यांच्या कुठेही प्रसंग नाहीत "लाईट लाईन" मध्ये ते दिसत नाहीत. रामायणात अनेक
संवाद प्रसंग आहेत. शत्रुघ्नला अहंकार नव्हता. मनुष्याच्या जीवनातील अहंकार हा
सर्वात मोठा शत्रू असल्याचे मंदार महाराज यांनी सांगितले. मी,माझे, मला हे शब्द
अहंकाराची प्रतीक असून ज्याच्याकडे अहंकार आहे. तो सदैव दुःखी असतो असे सांगत आपणच
आपल्याला दुःखाचे कारण बनतो ही वास्तविकता त्यांनी यावेळी सांगितली. आपल्यातील
शत्रूचा नाश करण्यासाठी शत्रुघ्नचे स्मरण करावे.शरणागती, शांतता,संयम,धैर्य हे गुण
मनुष्यात आवश्यक आहेत. हे आपल्याला या राष्ट्रीय ग्रंथामधून घेण्यासारखे आहेत.
लक्ष्मण हे सद्गुणाचे केंद्र असून ते शेषाचा अवतार आहेत. रामचंद्रांची कीर्ती
ध्वजाप्रमाणे तर त्या काठीचा दंड म्हणजे लक्ष्मण आहेत असा गौरव करत त्या चारही
भावंडांमध्ये मतभेद होते परंतु मनभेद नव्हते त्यांच्या विचारांची आणि ध्येयाची
योग्य वाटचाल होती. त्यांचे सर्व चरित्र आजच्या मानवी जीवनाला प्रेरणास्त्रोत
राहील.ह.भ.प. मंदार महाराजांनी अत्यंत पवित्रवाणीतून आपल्या रामकथेतील अनेक प्रसंग
अक्षरशः जिवंत करून सांगताना उपस्थित भाविक प्रेक्षकांना अनेकवेळा रडवले. प्रभू
रामचंद्राच्या चरित्रातून सामान्य धर्म शिकायला मिळतो असे सांगून लक्ष्मण
यांच्याकडे विशेष धर्म शिकायला मिळतो तर भरताकडे विशेषतः धर्म शिकायला मिळतो आणि
शत्रुघ्न यांच्याकडे विशेषतम धर्म शिकायला मिळतो.मनुष्याकडे धैर्य हा गुण नक्की
असायला हवा असे सांगून मंदार महाराज म्हणाले की,प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले धैर्य
सुटू देऊ देता कामा नये हे धार्मिक असल्याचे लक्षण आहे.प्रभू श्रीरामचंद्रांचे
चरित्र संपूर्ण जगाला माहिती आहे.प्रभू रामचंद्रांचे चरित्रातून सामान्य धर्म
शिकायला मिळतो. लक्ष्मणाच्या चरित्रातून विशेष धर्म शिकायला मिळतो भरत यांच्या
चरित्रातून विशेषतर धर्म शिकायला मिळतो आणि शत्रुघ्न यांच्या चरित्रातून विशेषतम
धर्म शिकायला मिळतो.शत्रुघ्न हे रामायणातील अल्पवर्णीत पण अत्यंत श्रेष्ठ
व्यक्तिमत्व आहे. शत्रूघ्नांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचा अहंकार पूर्णपणे शून्य
करून राम आणि भरत यांच्या प्रति पूर्ण समर्पण, स्वतःची इच्छा कधीही व्यक्त न
करणारे,सेवा हाच धर्म मानणारे,शत्रुघ्न म्हणजेच अहंकाराचा शत्रू, त्यांच्या नावातच
अर्थ दडलेला आहे. मानवाचे अहंकार, वासना,क्रोध,लोभ आणि द्वेष हेच खरे शत्रू असून
शत्रुघ्न यांनी स्वतःचा अहंकार मारला, स्वतःला प्रभूचे साधन मानले नाही.शत्रुघ्न
स्मरणामुळे अहंकार क्षीण होतो,सेवाभाव वाढतो,मन नम्र होते,दुर्गुण नष्ट होऊ
लागतात.शत्रुघ्न हे भक्तीचे प्रतीक आहेत.पुढे बोलताना महंत मंदार महाराज रामदासी
म्हणाले की,आजच्या जीवनात शत्रुघ्न तत्वाचे महत्त्व असून आजच्या काळात
स्पर्धा,स्वार्थ, प्रतिष्ठेची हाव आणि अहंकार हे सर्व वाढत आहे अशावेळी
शत्रूघ्नांचा आदर्श असे सांगतो की,मोठेपणा हा गाजवण्यात नाही तर सेवेत आणि समर्पणात
आहे. ईश्वरा प्रति पूर्ण शरणागती हाच विजय आहे. संतांप्रती आणि धर्माप्रती विनम्र
भाव हा भाव मित्र असून अहंकार हा भाव शत्रू आहे.परंपरेमध्ये एक मूलभूत तत्व वारंवार
सांगितले जाते ते म्हणजे नम्रता हीच खरी साधना असून संत सद्गुरू आणि धर्म यांच्या
प्रति विनम्र भाव ठेवणे म्हणजे स्वतःच्या मर्यादा ओळखून ईश्वर कृपेवर विश्वास
ठेवणे, अहंकाराच्या बंधनातून मुक्त होणे आणि विनम्रतेचे अध्यात्मिक फायदे असे होतात
त्यामुळे की,त्यामुळे अंतकरण शुद्ध होते.विवेक जागृत होतो ईश्वराशी नाते दृढ होते
म्हणूनच विनम्र भावाला मित्र म्हटले जाते कारण तो आपल्याला अध:पतनापासून वाचवतो
योग्य मार्गावर टिकवून ठेवतो भक्ती सेवा आणि समर्पण यांची वाढ करतो प्रभू
श्रीरामांचे बंधू लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांच्यामध्ये मत भिन्नता होती परंतु
मनभिन्नता नव्हती विविध मतांचा स्वीकार करून एकाच तत्वासाठी चारही भावंडे
धर्माप्रती तत्त्वाप्रती समर्पित होती त्यातील शत्रुघ्न यांचे चरित्र अभ्यासणे
मानवी जीवनाच्या यशस्वीतेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी शेवटी
सांगितले
चौकट
--------
मंदार महाराजांच्या राम कथेने
अध्यात्माचा सुगंध दरवळला!
----------------
रामायण महाभारतातील अनेक प्रसंग द्रष्टांतासह अक्षरशः जिवंत करून
सांगताना उपस्थित भाविक भक्तांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी
यावेळी यशस्वी केली.आष्टी,कडा, दादेगाव, टाकळसिग, जामखेड, शिराळसह तालुक्यातील आणि
इतर भागातून भाविक भक्त मोठ्या संख्येने या संगीत रामकथेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित
होते.कथेतून अध्यात्माचा सुगंध अक्षरशः दरवळताना दिसला!
------------------
0 टिप्पण्या