
आष्टी (प्रतिनिधी)
शेकडो वर्षापूर्वीपासून चालत आलेल्या सण,उत्सव,यात्रा जत्रा आणि
त्यातील परंपरा असलेल्या धार्मिक अधिष्ठानातील किंबहुना ग्रामीण भागात चालणाऱ्या
हजारो वर्षापासूनच्या पद्धती यातील साक्षीदार ठरलेले ८० ते १०० वर्षाचे जेष्ठ
नागरिक हा एक ठेवा आहे.अशाच एका ८५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाशी संवाद साधण्याचे
आणि अनुभव क्षण टिपण्याचे भाग्य पत्रकार उत्तम बोडखे यांनी आज एका यात्रेच्या
निमित्ताने घडून आणले आहे! आज शनिवारी आष्टी तालुक्यातील एका खंडोबाच्या
यात्रेमध्ये चक्क ८५ वर्षाचे जेष्ठ नागरिक अत्यंत हसतमुख चेहऱ्याने आणि निरोगी मन
आणि शरीराने यात्रेचा सुखद अनुभव आणि क्षण अनुभवत होते. यावेळी त्यांच्याशी
जाणीवपूर्वक थांबून संवाद पत्रकार उत्तम बोडखे यांनी साधला. यावेळी पत्रकार बोडखे
यांनी ज्येष्ठ नागरिक पांडुरंग सखाराम बोडखे ( वय वर्ष ८५) यांना त्या काळातील
यात्रा जत्रांचे उत्सव परंपरांचे पद्धती गुपित आणि त्या मागची भावना या अनुषंगाने
उकल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी उत्स्फूर्तपणे यात्रा त्यातील
कुस्त्यांच्या स्पर्धा तमाशा लहान मुलांसाठी असलेले विविध खेळण्या... आणि या सर्व
यात्रांसाठी वर्षभरापासून लहान मुलांनी ह्रदयात हुरहूर ठेवून पैसे जमवून ठेवलेला
पैसा... या गमती जमती आणि उत्सव परंपरा विषयी असलेले उत्कट भाव ऐकताना
अंगावर शहारे
येणार होता.ज्येष्ठ नागरिक पांडुरंग बोडखे यांची आजही ८५ वर्षानंतर तब्येत आणि
प्रकृती धडधाकट आहे याचे गुपित ही विचारले असता त्यांनी सांगितले.चांगल्या प्रकारचे
खाणे व्यसन न करणे व्यायाम करणे शेतीत सतत कष्टच राहणे याबाबी आम्हाला शंभर इकडे
नेण्यासाठी खऱ्या कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले.आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी
महाविद्यालय कड्याचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. जी.पी.बोडखे यांचे पांडुरंग बोडखे
हे वडील आहेत. आज शनिवारी एका खंडोबाचे यात्रेत त्यांच्या प्रकृतीची पत्रकार
बांधवांनी अत्यंत अष्टवाईकपणे चौकशी केली आणि त्या काळातील अनेक आठवणींना यावेळी
उजाळा देत त्यांनाही काही वेळ जुन्या काळात नेले. आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी
महाविद्यालय कडाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जी.पी. बोडखे यांचे वडील पांडुरंग
बोडखे (वय ८५) यांची आज खंडोबा यात्रेत भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.
0 टिप्पण्या