Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बंधाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करा! अन्यथा तहसील कार्यासमोर धरणे धरू ........ आ.भीमराव धोंडे यांचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशारा

आष्टी( प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव,आनंदवाडी, रुईनालकोल आणि नांदा येथील बंधारे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर बाधित व खराब झालेले आहेत.या बंधाऱ्यांच्या दुरवस्थेमुळे परिसरातील शेती आणि पाणी साठवणुकीवर गंभीर परिणाम होत आहे तर याची तात्काळ दखल घेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन करू! असा निर्वाणीचा इशारा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदारांना आणि मृदा व जलसंधारण उपविभाग्याचे उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.खेदाची बाब अशी की,या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबाबत उपविभागीय अधिकारी,मृदा व जलसंधारण उपविभाग आष्टी या कार्यालयाकडून अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही.वारंवार या विषयाकडे लक्ष वेधूनही प्रशासकीय स्तरावर उदासीनता दिसून येत आहे.याबद्दल माजी आमदार भीमराव धोंडे यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आपल्या स्तरावरून तातडीने पाठपुरावा करावा आणि येत्या दोन दिवसांत, म्हणजेच दि.५ जानेवारी २०२६ पर्यंत या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे असे नमूद करून जर या मुदतीत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली नाही तर मंगळवार दि.६ जानेवारी २०२६ रोजी आपल्या कार्यालयासमोर 'बेमुदत धरणे आंदोलन' करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील,यांची गंभीर दखल घ्यावी असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. चौकट -------- प्रशासनाच्या कार्यपद्धतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष ---------------- शेतकऱ्यांच्या अत्यंत प्रश्नावर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी लक्ष वेधले आहे.अत्यंत गरजेच्या शेतीविषयक विकासाच्या प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ पावले उचलून बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबाबत पाऊल उचलून शेतकऱ्यांना जगण्याचा आधार देत न्याय द्यावा अशी भूमिका मांडली आहे.प्रशासन किती दाखवते याची उत्सुकता सबंध शेतकऱ्यांना लागली आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या