Ticker

6/recent/ticker-posts

महसूल अन् अभियांत्रिकी नात्याचा 'राजपत्रित' स्नेहबंध ............ नायब तहसीलदार भगीरथ धारक यांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील नायब तहसीलदार श्री.भगीरथ चंद्रभान धारक यांची सुकन्या चि.सौ.कां.पूजा आणि वेलतुरी येथील श्री. बाळासाहेब ससाणे यांचे चिरंजीव सहाय्यक अभियंता शिवम ससाणे यांचा साखरपुडा समारंभ काल रविवारी दि. २५ जानेवारी रोजी आष्टी येथील आराज मल्टीपर्पज हॉलमध्ये अत्यंत मंगलमय वातावरणात आणि शाही थाटात संपन्न झाला.हा सोहळा केवळ दोन कुटुंबांचा मेळावा न राहता, भगीरथ धारक यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे एक व्यापक सामाजिक संमेलन ठरला. साखरपुडा विधीसाठी संपूर्ण सभागृह आकर्षक पुष्पसजावट आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. पारंपारिक धार्मिक विधी,मंगल वाद्यांचा गजर आणि मंत्रोच्चारांच्या पवित्र वातावरणात पूजा (एम.ए.,बी.एड.) आणि शिवम (राजपत्रित अधिकारी, सहाय्यक अभियंता) यांनी एकमेकांना अंगठी परिधान करून नव्या आयुष्याची अधिकृत घोषणा केली.या मंगल प्रसंगाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित असलेली अलोट गर्दी.महसूल विभागात कार्यरत असतानाही श्री.भगीरथ धारक यांनी कधीही अधिकारपदाचा अहंकार न बाळगता सर्वसामान्यांशी ठेवलेली नाळ या सोहळ्यात दिसून आली.यावेळी आ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर,जि.प.सदस्य देविदास धस,अभयराजे धोंडे,ह.भ.प.दिनकरराव तांदळे महाराज,ह.भ.प.विष्णु महाराज आंधळे,शिक्षण विस्तार अधिकारी मनोरंजन धस,बीड जि.प.चे
माजी अध्यक्ष डॉ.शिवाजी राऊत,बीड जि.प.चे माजी अध्यक्ष विजय गोल्हार,जि.प.सदस्य सतीशआबा शिंदे,सभापती रमजान शेख तांबोळी,संजयशेठ मेहेर,सुखदेव पोकळे,सुखलाल मुथा,दिलीपशेठ मेहेर,सतीशशेठ धस, संतोष भैय्या चव्हाण,अमोलराजे तरटे,जालिंदर पोकळे,अमोलराजे शिंदे,अनिलतात्या ढोबळे,राजाबापू कर्डिले,संभादादा कर्डिले,दिलीपशेठ दारुणकर,अनिल राऊत(बीड),सुनील सूर्यवंशी,माजी सभापती अंकुश चव्हाण,माजी उपसभापती परमेश्वर काका शेळके,माजी सभापती विजयकुमार बांदल,विठ्ठल बांदल,किशोरनाना हंबर्डे,रवीकाका ढोबळे,सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे,नायब तहसीलदार बाळदत्त मोरे,नायब तहसीलदार शिरसेवाढ नाना, नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर तात्या,नगराध्यक्ष जिया बेग,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रफुलभाऊ सहस्रबुद्धे,अविनाश कदम,प्रवीण पोकळे,गणेश दळवी,संतोष सानप,गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने,सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब,माजी सभापती संजयनाना ढोबळे,ह.भ.प.हौसराव आजबे महाराज,बबनराव आवटे,नवनाथ पठाडे,इंद्रजित शेंदूरकर,चंद्रकांत शिंदे,राष्ट्रीय खेळाडू बाळासाहेब शेंदुरकर,हौसराव एकसिंगे,दादासाहेब जगताप,टकले,रुद्रा पाटील सूर्यवंशी,चेअरमन बाबासाहेब सूर्यवंशी,पांडूतात्या क्षीरसागर,अरुणभैय्या निकाळजे,फक्कड वाल्हेकर,गंगापाटील शिरसाट,सुभाष जगताप,बा.म.पवार,कैलास पोकळे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे,सुनील रेडेकर,डॉ.मधुकर हंबर्डे,डॉ.राजेंद्र जरांगे,देविदास उदावंत,आजिनाथ गव्हाणे,शंकर गव्हाणे,बाबुराव गव्हाणे,नवनाथ गव्हाणे,वसुंधरा प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापक श्रीमती बोंदार्डे, राजकीय, प्रशासकीय,सामाजिक, शैक्षणिक,वैद्यकीय आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.आष्टी,धानोरा,वेलतुरीसह जिल्हाभरातून आलेल्या हितचिंतकांनी धारक यांच्या लोकाभिमुख व्यक्तिमत्वाचे भरभरून कौतुक केले. दोन प्रतिष्ठित सुसंस्कृत कुटुंबांचे मिलन ----------------- धारक परिवार हा धानोरा परिसरात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असून,ससाणे परिवारही आपली सामाजिक बांधिलकी जपणारा म्हणून ओळखला जातो.या दोन प्रतिष्ठित आणि सुसंस्कृत कुटुंबांच्या एकत्र येण्याने समाजापुढे एक सकारात्मक आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.समारंभाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि कौतुकास्पद होते.वृद्ध आणि महिला पाहुण्यांसाठी चांगली भोजन व्यवस्था आणि पाहुण्यांचे स्वागत यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण होते.निमंत्रक म्हणून बापुराव धारक,भगीरथ धारक,संतोष धारक,गुलाब धारक यांनी आलेल्या पाहुण्याचे स्वागत केले. आपुलकी,स्नेह आणि संस्कृतीचा वारसा जपणारा हा साखरपुडा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.उपस्थित मान्यवरांनी या नियोजित वधू-वरांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या