Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी आगाराच्या मदतीला 'गोल्हार सराफ व कलेक्शन' सरसावले; ४० मार्गदर्शक बोर्डांची भेट देऊन जोपासले सामाजिक दायित्व

आष्टी (प्रतिनिधी) एसटी महामंडळ ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते.याच जीवनवाहिनीला सहकार्याचा हात देत,आष्टी येथील नामवंत 'गोल्हार सराफ आणि कलेक्शन' च्या वतीने चालक प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आष्टी आगाराला बसवर लावले जाणारे ४० मार्गदर्शक बोर्ड (फलक) भेट देण्यात आले.आपल्या व्यवसायासोबतच सामाजिक उत्तरदायित्व जपण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज शनिवारी 'चालक दिन' साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून गोल्हार सराफ व गोल्हार कलेक्शनचे संचालक राजूकाका गोल्हार आणि प्रदुम्न गोल्हार यांनी आष्टी आगार प्रमुख चोथमल यांच्याकडे हे ४० बोर्ड सुपूर्त केले.प्रवाशांच्या सोयीसाठी बसवर लावले जाणारे हे बोर्ड अत्यंत आवश्यक असतात, ही गरज ओळखून गोल्हार परिवाराने ही मदत केली आहे. ​ चालक दिनानिमित्त विना अपघात सेवा देणाऱ्या चालकांचाही यथोचित गौरव --------------- ​केवळ वस्तूंची भेट देऊन न थांबता, प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या चालकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.अनेक वर्षांपासून विनाअपघात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या चालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.चालक हा एसटीचा कणा आहे, त्यांच्या सतर्कतेमुळेच हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होतो अशा भावना यावेळी गोल्हार यांनी व्यक्त केल्या.​या स्तुत्य उपक्रमाच्या वेळी आगार प्रमुख प्रेमचंद चोथमल यांच्यासह वाहन परीक्षक राजू गर्जे,मुटकुळे,इमारत काळे,महेश कर्डिले, गाढवे,आजिनाथ बडे,बळीराम बन, सुनील शिरसाट, नारायण लाड,बाप्पू लाड,दिलीप उपरे, सोनवणे,कैलास वायभासे,देशमुख, पोपट तांदळे, अशोक वारे,रामा लाड,कैलास गर्जे, रामा धुमाळ, बंकट वाघुले व एसटी महामंडळाचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.​गोल्हार सराफ व कलेक्शनने दाखवलेल्या या दातृत्वामुळे आष्टी आगाराच्या कामकाजात आणि प्रवाशांच्या सोयीत मोलाची भर पडली आहे. -------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या