Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानाची कास धरून प्रगत शेती करावी माजी आ.भीमराव धोंडे ........ पाटण सांगवीत एनएसएस शिबिराचा समारोप

आष्टी (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेती करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आष्टी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले. आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कृषी महाविद्यालय आणि कृषी तंत्र महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 'राष्ट्रीय सेवा योजना' (NSS) विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे आष्टी तालुकाध्यक्ष अशोक साळवे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, प्रशासन अधिकारी डॉ.डी.बी.राऊत, माजी सरपंच रामराव पाटील जगताप,सरपंच माऊली वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दादासाहेब जगताप, शहादेव गर्जे,मधुकर चव्हाण,माजी चेअरमन छगन तरटे,प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळ, प्राचार्य डॉ.साईनाथ होळकर,सुदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक साईनाथ बोडखे, हरी पाटील बोडखे, युवानेते सतीश आंधळे,माजी सरपंच संजय वनवे,लक्ष्मण वनवे,दत्ता आडकर देवा,पत्रकार संजय खंडागळे,ॲड. अनिकेत वनवे, सोमनाथ वनवे, तुषार गर्जे, भाऊसाहेब जगताप आणि भाऊसाहेब मांढरे यांसह अनेक मान्यवर,प्राध्यापक, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सात दिवस चाललेल्या या शिबिराचा समारोप अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाची शपथ ---------------- कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याची सामूहिक शपथ घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम आरसूळ यांनी विद्यार्थ्यांच्या सात दिवसांच्या श्रमदानाचे विशेष कौतुक केले.राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.जे.व्ही.सानप यांनी शिबिराचा सात दिवसांचा सविस्तर अहवाल सादर केला.ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला. लोककलेच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर ----------------- शिबिराच्या समारोपानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली. पोवाडा, भारूड आणि पथनाट्यांच्या माध्यमातून: ग्रामस्वच्छता,व्यसनमुक्ती,जलसंधारण यासारख्या विषयांवर प्रभावी प्रबोधन करण्यात आले.या उपक्रमातून पाटण सांगवी परिसरात सामाजिक सलोख्याचा आणि स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवला गेला.कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाबद्दल पाटण सांगवीच्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालय प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.
----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या