Ticker

6/recent/ticker-posts

महिला सक्षमीकरण,पालक जागृती व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित साधणारा हळदीकुंकू कार्यक्रम! ......... पं.नेहरू विद्यालयात सौ.दमयंतीताई धोंडे यांच्या निमंत्रणाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद .......... माता-पालक मेळावा उत्साहात संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) "नारी शक्ती ही राष्ट्राच्या प्रगतिशील जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असते; किंबहुना राष्ट्राच्या सर्वांगीण विकास करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांचा सहभाग मौल्यवान असतो असे सांगत महिलांच्या सबलीकरण आणि सर्वांगीण परिश्रमातून राष्ट्र घडत असते!" असे मौलिक विचार सौ.दमयंतीताई भीमराव धोंडे यांनी आज येथे मांडले. आष्टी शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात शनिवार दि.१७ जानेवारी रोजी सकाळी हळदी कुंकू कार्यक्रमासह माता-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.पं.नेहरू विद्यालय,छत्रपती शिवाजी विद्यालय व गंगुबाई आनंदराव धोंडे प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमात सौ.दमयंती धोंडे बोलत होत्या.यावेळी सौ.अक्षता अजय धोंडे,आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रा.मोहीनी गोसावी,मराठे, देशमुख, सौ.सविता राजेंद्र धोंडे, मेहर मॅडम,नंदा फुले,अनिता विधाते,रेखा धोंडे,आश्विनी शेलार,वंदना बोडखे,आरती वनवे,सारिका गव्हाणे, गिरी मॅडम, सुनयना धोंडे,शाळेचे प्राचार्य सुरेश बोडखे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत व संतोष थोरवे उपस्थित होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर,माता रमाई यांच्यासह राष्ट्रमातांच्या विचारांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व महिला भगिनींचे विद्यालय आणि धोंडे परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सौ.दमयंती धोंडे यांनी म्हणाल्या,"आज महिला सर्वच क्षेत्रात सक्षम होत आहेत.महिला पालकांनी आपल्या मुलांमधील कला, गुण ओळखून त्यांना ते आत्मसात करून द्यावेत. मुलांना मैदानी खेळ, संगीत व विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो असे सांगितले. सौ. अक्षता धोंडे यांनी मुलं सक्षम व्हावीत, त्यांनी विविध क्षेत्रात प्रगती करावी यासाठीपालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. पालकांनी आपल्या मुलांचे दैनंदिन उपक्रम, आवड-निवड याकडे सातत्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी अनेक महिला भगिनींनी विविध विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आणि धोंडे परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या या उत्कृष्ट नियोजनातील हळदीकुंकू कार्यक्रमाचे कौतुक केले.सौ. अक्षता धोंडे यांनी आलेल्या सर्व भगिनींना त्यांच्या भविष्यातील आनंदी निरोगी यशस्वी प्रवासाला शुभेच्छा देत सर्वांच्या आभार मानले. चौकट -------- सौ दमयंती ताई धोंडे यांच्या संयम, प्रेम आणि आपुलकीचे कौतुक! -------------------- -------- हा कार्यक्रम महिला सक्षमीकरण, पालक जागरूकता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा ठरला. यावेळी सौ. दमयंतीताई भीमराव धोंडे यांच्यासह परिवार आणि विद्यालयातील सर्व शिक्षिका आणि शिक्षक बांधवांच्या उत्तम नियोजनाचे उपस्थित मोठ्या प्रमाणावर महिला भगिनींनी मनापासून धन्यवाद देत सौ.दमयंतीताई धोंडे यांचा शांत संयमी आणि प्रेमळ स्वभाव या व्यक्तिमत्त्वाचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.
--------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या