
श्रीगोंदा (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी राजु शेख, उपाध्यक्ष विजय मांडे तर सचिवपदी रामदास कोळपे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
सोमवार दि.19 रोजी तालुका विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची श्रीगोंदा तालुका पदाधिकारी यांची मावळते अध्यक्ष पिटर रणसिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये पुढील निवडी करण्यात आल्या अध्यक्षपदी राजु शेख,उपाध्यक्ष विजय मांडे, रामदास कोळपे यांची तर कार्याध्यक्ष केशव कातोरे, खजिनदार सुरेश हिरवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हि निवड एक वर्षासाठी केली आहे.
निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच जेष्ठ पत्रकार अमिनभाई शेख यांची श्रीगोंदा नगरपालिकेत स्विकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते म्हणाले कि राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे,राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या निवडी करित आहोत. पत्रकार संघात काम करताना आपण संघातील प्रत्येक व्यक्तीला दरवर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारीला निवडी करुण काम करण्यासाठी संधी देतो. आतापर्यंत संघात प्रत्येक पदाधिकारी यांनी चांगले काम करुण संधीचे सोने केले आहे.
पुढील काळात निवडलेले सहकारी आणखी उल्लेखनीय काम करतील याचा मला आत्मविश्वास आहे.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी,तालुकाध्यक्ष सुरेशमामा सुपेकर, विजय भंडारे, संजय शेळके,मल्हारी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
निवडीला दादासाहेब सोनवणे, अंकुश तुपे, आप्पासाहेब चव्हाण, प्रा.राम सोनवणे, पंकज गणवीर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी हजर होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम सोनवणे यांनी करुण माजी उपाध्यक्ष आप्पा चव्हाण यांनी सर्वाचे आभार मानले.
चौकट: नगरपालिकेत पत्रकारांचे प्रश्न सोडवू- शेख
तालुक्यातील सर्व सहकारी पत्रकार बंधूंच्या सहकार्याने श्रीगोंदा नगरपालिकेत स्विकृत नगरसेवक म्हणून माझी निवड झाली.
मिळालेल्या पदाच्या माध्यमातून शहरातील सामान्य जनतेचे तसेच पत्रकार बंधूचा जिव्हाळ्याचा पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन जेष्ठ पत्रकार नुतन नगरसेवक अमिनभाई शेख यांनी दिले.
0 टिप्पण्या