
आष्टी (प्रतिनिधी) भगवान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय
गंगाई- बाबाजी रौप्य कला महोत्सव उत्साहात पार पडला.या महोत्सवात संस्थेतील ५४
शाळांनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेत गंगुबाई आनंदराव धोंडे प्राथमिक शाळेने
उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम पारितोषिक पटकावले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष
भीमराव धोंडे सौ.दमयंतीताई धोंडे (माई) यांच्या हस्ते शाळेला सन्मानचिन्ह व १५ हजार
रुपये रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.या कला सादरीकरणात शाळेतील ४८ विद्यार्थ्यांनी
सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे हे सादरीकरण
परीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले.या यशाबद्दल युवा नेते डॉ.अजय दादा धोंडे तसेच
संस्थेचे सर्व प्रशासन अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत,शाळेचे
शिक्षक,पालक व ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.या
कार्यक्रमाची कोरिओग्राफी प्रमोद राऊत व विनोद विधाते यांनी केली. हा कार्यक्रम
उत्कृष्ट पार पडावे यासाठी साळवे हनुमंत साळवे,श्रीमती वंदना बोडखे श्रीमती सारिका
गव्हाणे, श्रीमती सुनीता गदादे,दिलीप गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
-------------------
0 टिप्पण्या