Ticker

6/recent/ticker-posts

महिलांचे सक्षमीकरण,आरोग्य व सामाजिक बंध जोडण्याचे माध्यम - नगराध्यक्ष सौ.मायाताई मुंडे ----------------------------------- डॉ.आशा फड यांच्या निवासस्थानी हळदी-कुंकू पवित्र सोहळा

आष्टी (प्रतिनिधी) सौभाग्य समृद्धी व सामाजिक स्नेह वाढवणारा एक पवित्र भारतीय संस्कृती सोहळा म्हणजे संक्रातीच्या दरम्यान चा हार्दिक कुंकू कार्यक्रम.या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण,आरोग्य व सामाजिक बंध जोडण्याचे कार्य घडते असे मौलिक प्रतिपादन नगराध्यक्ष सौ.मायाताई मुंढे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य सेट,नेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या बीड जिल्हा समन्वयक तथा हिंदी भाषा साहित्यिक डॉ. आशा फड-चाटे यांच्या निवासस्थानी हळदी- कुंकवाचा पवित्र भारतीय सांस्कृतिक सोहळा आयोजित केला होता.त्यावेळी दीप प्रज्वलन करून उद्घाटन नगराध्यक्ष मायाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या.समवेत नूतन नगरसेविका सौ.उज्वलाताई मुंडे, सौ.संगीताताई दराडे,सौ. कल्याणीताई उगले,सौ.ढाकणे ताई आदी सह मान्यवर भगिनींची उपस्थिती होती. प्रारंभी माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष सौ.मायाताई मुंडे पुढे म्हणाल्या,हळदी कुंकू हा सौभाग्य,समृद्धी व सामाजिक स्नेह वाढवणारा एक पवित्र भारतीय सांस्कृतिक सोहळा आहे.महिलांना एकत्र आणून सामाजिक बंध दृढ करणे, हळदीच्या औषधी गुणधर्मा द्वारे आरोग्य रक्षण करणे आणि कुंकवातून मांगल्याचा संदेश देणे हा उद्देश आहे.नगरसेविका सौ.उज्वलाताई मुंडे यांनी हा सोहळा सौभाग्य व आरोग्य आणि सामाजिक स्नेह तसेच स्त्रीशक्तीचा सन्मान वाढवणारा आणि आपापसात स्नेह वाढवण्याचे व्यासपीठ असल्याचे सांगत सांस्कृतिक परंपरा जपण्याचे हे माध्यम असल्याचे सांगितले.या संवादात्मक हळदी- कुंकू कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ. मायाताई मुंडे, नगरसेविका उज्वलाताई मुंडे,श्रीमती संगीता ताई दराडे, श्रीमती सावंतताई, शिक्षिका गंगाताई सानप, कृषी विस्तार अधिकारी सौ. सविताताई सानप,श्रीमती सोनाली आगळे, उषाताई शेळके, रेखाताई चाफेकर, मंगल चाफेकर, संगीताताई शिंदे, सौ. शेकटकर, ग्रंथपाल सौ.कल्याणी उगले,सुनंदाताई शिंपी, सौ. धोत्रे ताई, सौ. वीर मॅडम, आदी सह अनेक महिला भगिनींची उपस्थिती होती. सर्व विविध क्षेत्रातील भगिनींनी सहभाग घेत तिळगुळ आणि वैचारिक संवाद साधत अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात वैचारिक मंथन केले. शेवटी डॉ.आशा फड-चाटे यांनी सर्वांचे आभार मानले. चौकट --------
दरम्यान, विविध क्षेत्रातील महिला भगिनींच्या उपस्थितीत या हाळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात शेवगाव नगरीच्या नूतन नगराध्यक्ष सौ.मायाताई मुंडे आणि नगराध्यक्ष नगरसेविका सौ.उज्वलाताई मुंडे यांच्यावतीने पीएच.डी. प्रदान झाल्याबद्दल डॉ.आशा फड-चाटे यांचे अभिनंदन करून सत्कार केला.यावेळी महिला भगिनींनीही डॉ.आशा फड यांना शुभेच्छा दिल्या. --------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या