Ticker

6/recent/ticker-posts

शृंगेरी विद्यालयाचे चित्रकला परीक्षेत चार विद्यार्थी ए श्रेणीत उत्तीर्ण, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

आष्टी ( प्रतिनिधी ) ब्रह्मगाव येथील शृंगेरी विद्यालयाचा चित्रकला १०० टक्के निकाल लागला आहे. शृंगेरी विद्यालयाचे चित्रकला परीक्षेत चार विद्यार्थी ए श्रेणीत उत्तीर्ण, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.यावर्षीच्या चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के या शाळेतील एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत २७ विद्यार्थी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पास झाले आहेत.ऋत्विका निकाळजे,आरती डोंगरे,वेदिका सानप,उत्कर्ष निकाळजे हे चार विद्यार्थी A श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.५३ व्या. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळवला. आंबेजोगाई येथे जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी शाळेचे विद्यार्थी सार्थक आजबे व समर्थनाळे या दोन विद्यार्थ्यांनी राहुल पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस जिल्ह्याचे नेतृत्व केले आज दि.१२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती शाळेत साजरी करण्यात आली यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला परीक्षेचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.५३ वे. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेले विद्यार्थी सार्थक आजबे व समर्थनाळे या दोन विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे यांनी अभिनंदन केले. डॉ. अजयदादा धोंडे,अभयराजे धोंडे यांनी अभिनंदन केले.या यशाबद्दल संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी. राऊत, प्रा.शिवदास विधाते सर,माऊली बोडखे सर,संजय शेंडे,सागर वाघुले, संदीप नन्नवरे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता माने मॅडम,सहशिक्षक गदादे एस.पी.,शिंदे डी. टी.,जाधव, पठाण सर,बनसोडे सर,धोत्रे सर,पवार सर,श्रीमती शिंदे मॅडम, युनूस शेख, खिलारेमामा, ब्रह्मगावचे सरपंच, उपसरपंच, आंबेवाडी,कासेवाडी शेकापूर ,हाजीपुर, भाळवणी, सर्व पालकांनी अभिनंदन केले. शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या