
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या एलिमेंटरी चित्रकला
परीक्षेत अंभोरा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी
उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला आहे.या परीक्षेत ११
विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ५ विद्यार्थ्यांना "ए ग्रेड", ५
विद्यार्थ्यांना "बी ग्रेड" आणि १ विद्यार्थी "सी ग्रेड" मिळवून आपली कलात्मक
गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेची १ ते ७ वर्ग असलेली जिल्हा परिषद
केंद्रीय प्राथमिक शाळा अंभोरा ही नेहमीच वेगवेगळ्या गुणवत्तात्मक उपक्रम आणि
सहशालेय कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असणारी शाळा आहे. यावर्षीच्या महाराष्ट्र
शासनाद्वारा घेण्यात आलेल्या एलिमेंट्री परीक्षेमध्ये शाळेतील ११ विद्यार्थी
बसविण्यात आले होते. त्यापैकी गायत्री पांडुरंग वाणी, श्रावणी उद्धव खाकाळ, श्रावणी
किरण ओव्हाळ,मानसी राजेश आटोळे, आयान अल्ताफ पठाण या ५ विद्यार्थ्यांनी "ए ग्रेड"
प्राप्त केला आहे. तसेच जानवी संतोष आमले, सार्थक सुनील आटोळे, संस्कार नवनाथ
आमले,आदित्य कानिफनाथ ओव्हाळ, सिध्दी सुनील कांबळे या विद्यार्थ्यांना "बी ग्रेड"
प्राप्त झाला आहे तर शिवम संतोष काळे या विद्यार्थ्याला "सी ग्रेड" प्राप्त झालेला
आहे.महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या एलिमेंट्री चित्रकला परीक्षेमध्ये
येवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवीच्या
वर्गातील विद्यार्थी, या गुणवत्तेने उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.या
उल्लेखनीय यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, कला विषयातील आवड व
शाळेमध्ये नियमाने चित्रकला, रंगभरण सारख्या होणाऱ्या स्पर्धांचा विद्यार्थ्यांना
फायदा झालेला आहे.या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन
मुख्याध्यापक अशोक शिंदे, शिक्षक शिवाजी खुडे, अण्णासाहेब घोडके, शफिक खान,संतोष
पवार, कविता सोनवणे,अनामिका शिंदे या शिक्षकांचे लाभलेले आहे. तसेच या शाळेवर
पूर्वी कार्यरत असलेल्या शिक्षिका कल्पना झांजे यांचे सहकार्य होते.सर्व
शिक्षकांच्या योग्य नियोजनामुळे व प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास
वाढून हे यश संपादन झाले आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती,
ग्रामपंचायत अंभोरा व पंचक्रोशीतील पालकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या