
आष्टी (प्रतिनिधी)
लोककला अभ्यासक व मुक्त पत्रकार भगवान राऊत यांची डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या वतीने दि. ११ व १२ जानेवारी २०२६
रोजी विद्यापीठ परिसरात होणाऱ्या केंद्रीय लोककला महोत्सवासाठी परीक्षक म्हणून निवड
करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.कैलास अंभुरे यांच्या
स्वाक्षरीसह त्यांना प्राप्त झाले आहे.विद्यापीठ परिसरात दि. ११ व १२ जानेवारी २०२६
रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,जालना,बीड व धाराशिव या ४ जिल्ह्यातील ६५
महाविद्यालयांनी केंद्रीय लोक कला महोत्सवात विविध लोककला स्पर्धांमध्ये आपला सहभाग
नोंदविला आहे.केंद्रीय लोक कला महोत्सवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाद्वारे आयोजित केंद्रीय लोककला महोत्सवामध्ये महाराष्ट्राच्या पारंपरिक
११ लोककला प्रकारात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये
गोंधळ,पोवाडा,भजन, भारुड,लावणी,लोकगीत, लोकनाट्य,वासुदेव, कव्वाली, जलसा, कविता अशा
सांघिक व वैयक्तिक स्पर्धा होणार आहेत.त्यामध्ये भारुड सांघिक व वासुदेव वैयक्तिक
या २ कलाप्रकारासाठी लोककला अभ्यासक भगवान राऊत यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल आ.संग्राम जगताप,माजी आ.लहू कानडे, माजी आ.भीमराव धोंडे,
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ
यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या