Ticker

6/recent/ticker-posts

आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणा एका नेत्याचे बाहुले बनु नये; अन्यथा मोठे आंदोलन करू! --- माजी आ. भीमराव धोंडे, माजी आ. बाळासाहेब आजबे यांचा इशारा ---------------- आष्टी तहसील समोरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; प्रशासन हादरले ------------------- अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि मनरेगाच्या कामांत भेदभाव करू नका

आष्टी (प्रतिनिधी) "आष्टी विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने आणि मनरेगांतर्गत कामांत शासकीय अधिकाऱ्याकडून व कर्मचाऱ्याकडून भेदभाव केला जात आहे.हा भेदभाव कोणाच्यातरी सांगण्यावर होत आहे. लोकप्रतिनिधींनी भेदभाव करू नये.आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणा एका नेत्याचे बाहुले बनु नये... अन्यथा मोठे आंदोलन करू!" असा सज्जड इशारा माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आज आष्टी येथे उपस्थित हजारो आंदोलकांच्या साक्षीने प्रशासनाला दिला. तसेच आष्टी विधानसभा मतदार संघात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. अनेक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत. हे हल्ले कोणाचे कार्यकर्ते करीत आहेत..? कोणाच्या सांगण्यावर करीत आहेत.. ? हेही जनतेला माहीत असून पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे. आरोपीवर गुन्हे दाखल होत नाहीत.त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मतदार संघातील विविध प्रश्न व हल्लेखोरावर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी लवकरच शिष्टमंडळ घेऊन भेटणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भाऊसाहेब लटपटे यांनी आक्रमक पद्धतीने भाषण करताना सांगितले. आष्टी तहसील कार्यालयासमोर माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघातील विविध प्रश्नांसाठी आज गुरुवारी धरणे आंदोलन आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह भव्य धरणे आंदोलन केले. मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येत आक्रमक पवित्रा घेतला.गेल्या काही महिन्यांपूर्वी आष्टी विधानसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती.यामध्ये रस्ते,बंधारे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले. शासन दरबारी या नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात मदत पडलेली नाही. "पंचनामे झाले,पण पैसा कुठे आहे?" असा सवाल उपस्थित करत दोन्ही माजी आमदारांनी प्रशासनाचा निषेध केला. अतिवृष्टीच्या मदतीसोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाची अनेक कामे प्रशासकीय पातळीवर अडकून पडली आहेत. विशेषतः ज्या विहिरींचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले होते, त्यांची मान्यता अचानक रद्द करण्यात आली आहे. या विहिरींना पुन्हा तातडीने मान्यता देऊन कामे सुरू करण्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी.खराब झालेले रस्ते आणि बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी.मनरेगा अंतर्गत रखडलेली वैयक्तिक व सार्वजनिक कामे सुरू करावीत. जिओ टॅगिंग होऊन रद्द झालेल्या विहिरींना पुन्हा प्रशासकीय मान्यता द्यावी. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आष्टी तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे, पाटोदा तालुकाध्यक्ष दीपकदादा घुमरे, शिरूर कासार तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे,माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथदादा वनवे,माजी शिक्षण सभापती नियमत बेग,युवा नेते अजयराजे धोंडे, युवा नेते अभयराजे धोंडे, युवा नेते धैर्यशील थोरवे,युवा नेते यशभैय्या आजबे,युवा नेते महेश आजबे,ॲड. भाऊसाहेब लटपटे,आरपीआय आष्टी तालुकाध्यक्ष अशोक साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले, नामदेव शेळके,शेख अस्ताक भाई,श्याम भैय्या हुले, दिलीपराव काळे,अशोक खेळकर,ॲड. रत्नदीप निकाळजे, ॲड.संभाजी दहातोंडे,राजपाल शेंडगे, संभाजी जगताप,बबनराव औटे,अभिलाष गाडेकर पाटील, गोकुळ सवासे, गणेश मोहोळकर, दिगंबर नाईकनवरे, आनंद घुमरे,कृष्णा मिसाळ, आदेश निमोणकर, संभाजी जगताप, पांडुरंग गावडे, अनिल बडे,उद्धव शिरसाठ, जालिंदर गायकवाड नेते,बाबा ससाणे,गौतम ससाणे,हरिभाऊ जंजिरे, सुदामकाका झिंजुर्के, बजरंग कर्डिले, अंकुशराव मुंडे,वैभव बडे,शेख नइम,राहुल शेळके, फजल शेख,शेख हादी,सनी काळपुंड, नितीन निकाळजे, सदाशिव दिंडे, सुनिल शिंदे,केदार जगताप, वसीम शेख, सावळेराम जायभाये,अशोक खेडकर,बापूराव जाधव,झुंबर चव्हाण,जालिंदर देवकर,सरपंच भरत जाधव,सरपंच माऊली वाघ, सरपंच संजयदादा विधाते,माऊली वाघ,बापूराव आव्हाड,संजय नालकोल,हरिभाऊ दहातोंडे,डॉ.सुनील गाडे, ताराचंद कानडे,डॉ.संतोष कदम,संजय चंदनशिव,बबनराव काकडे,चंद्रशेखर साके आदी मान्यवर उपस्थित होते. --------------- चौकट --------- बिडिओ साहेब यांनी भेदभाव करू नये! ------------------- बीडिओ साहेब तुम्ही राजकीय दवाखाली येऊन आमच्या समर्थकांच्या वैयक्तिक लाभाचे तसेच रस्ते, शेततलावाचे, विहिरी,एमआरईजीएसची कामे आडवू नका.भेदभावाचे काम करू नका.तुम्ही शासकीय अधिकारी आहात हे विसरू नका.असे दोन्ही माजी आमदाराने आक्रमक भाषाशैलीत सांगितले. धरणे आंदोलन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार वैशाली पाटील गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने कार्यकारी अभियंता शिनगारे हे आले होते.आपल्या सर्व मागण्यांचा विचार करून तात्काळ प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिले. आंदोलनाला मोठा प्रतिसाद; आंदोलनकर्त्याच्या तीव्र भावना ----------------- आज नियोजित तहसील समोरील आंदोलनाला आष्टी, पाटोदा, शिरूर मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हाकेला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीचे हे आंदोलन अत्यंत तीव्र स्वरूपाचे‌ आणि यशस्वीरीत्या पार पडले. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या