








उत्तम बोडखे,आष्टी (प्रतिनिधी)
-------------------------
आष्टी,पाटोदा,शिरूरसारख्या दुष्काळी भागातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या मुलांना शिक्षणाबरोबरच भविष्य काळासाठी उपयुक्त ठरणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (A.I.) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता शिकविणारे महाविद्यालय आपण लवकरच सुरू करू..!" अशी घोषणा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी, पाटोदा,शिरूरचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी आज येथे केली.तसेच
आष्टी,पाटोदा, शिरूरचे माजी आ.भीमराव धोंडे यांनी मला त्यांच्या आई-वडिलांच्या नावाने दिला जाणारा " गंगाई बाबाजी जीवनगौरव पुरस्कार " देऊन सन्मानित केले. त्यामुळे मला मोठा आनंद झाला.भीमराव धोंडे साहेबांची काम करण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे. त्यांच्या या उपक्रमाचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. मात्र सध्या समाजात जे काही चालले आहे ते लोकशाही पद्धतीने चालले का हुकूमशाही पद्धतीने चालले ? ते जनतेनेच ठरवावे असे सांगत आपल्या हातून भविष्य काळातील आदर्श पिढ्या घडाव्यात असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी केले.
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी,पाटोदा,शिरूरचे माजी आ. भीमराव धोंडे यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ भगवान महाविद्यालयात आयोजित गंगाई बाबाजी रौप्य कला महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री
शिवाजीराव दादा पंडीत,सुभाष सारडा,माजी आ.राजेंद्र जगताप,सुशीलाताई मोराळे, सौ.दमयंती धोंडे, नायब तहसीलदार भगीरथ धारक,
महंत काशिनाथ महाराज, दिनकर तांदळे महाराज,
वाल्मीकतात्या निकाळजे, उपसभापती पांडुरंग नागरगोजे,अशोक साळवे, विजुशेठ कोठारी, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, लालाभाऊ कुमकर, दिपकदादा घुमरे,बबन औटे, पांडुरंग गावडे,सुदाम काका झिंजुर्के,अंकुश मुंडे,डॉ.शैलजा गर्जे,स्वामी सानप,बबन मांगडे, पत्रकार भगवान राऊत,पत्रकार उत्तम बोडखे,सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर सर्व सर्व प्राचार्य,मुख्याधापक प्राध्यापक,शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी बोलताना माजी आ.भीमराव धोंडे पुढे म्हणाले की,बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात काम करण्याची अजूनही गरज आहे.बीड सारख्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये अजूनही निरक्षर लोकांचे प्रमाण काही अंशी शिल्लक आहे.आपण सुरू केलेल्या शाळा, महाविद्यालयाचा उपयोग इथल्या ग्रामीण भागातील लोकांना झाला. आपल्या भागातील ऊस तोडणी कामगारांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे.मात्र रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविणे हे लोकप्रतिनिधी समोर मोठे आव्हान आहे. साहित्यिकांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर लिखाण केले पाहिजे. शेतकऱ्यांचा उद्धार शिकलेल्या लोकांनी केला पाहिजे. विशेषता पीएच.डी. मिळवलेल्या प्राध्यापकांनी वेगवेगळ्या विषयावर मातृभाषेतून पुस्तके लिहिली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.सन २००० साली भगवान महाविद्यालयाच्या एका हॉलमध्ये सुरू केलेला गंगाई बाबाजी महोत्सव रोप्य महोत्सवी वर्षात येऊन पोहोचला आणि त्याचे एका वेलीचे रूपांतर वटवृक्षात झाले. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आणखीन वाढली आहे. आपल्या मनोगतातून आईची आठवण काढताच आ. धोंडे गहिवरले.
यावेळी प्रा.सुशीलाताई मोराळे,प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे,डॉ.विलास सोनवणे, प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी धार्मिक,शिक्षण,कृषी,वैद्यकीय, क्रीडा,उद्योग, साहित्य,प्रशासन, कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी प्रास्ताविक केले.प्रा.डॉ.ज्ञानदेव वैद्य, प्रा.बाळासाहेब
खेमगर,प्रा.सुरेश फुले, प्रा. श्रीकांत धोंडे यांनी सूत्रसंचालन केल.उपप्राचार्य डॉ. आप्पासाहेब टाळके यांनी आभार मानले.
चौकट
--------
माजी मंत्री शिवाजीराव
पंडित दादांकडून
धोंडे यांच्या कामाच्या
पद्धतीचा विशेष उल्लेख
-----------------
आज या मंचावर बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांना गंगाई- बाबाजी जीवनगौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.आपल्या सत्काराला उत्तर देताना दादांनी विविध सद्यस्थितीवरील परिस्थितीवर भाष्य केले.यावेळी गंगाई बाबाजी जीवनगौरव पुरस्काराने मला आनंद झाल्याची भावना व्यक्त करत माजी आ.भीमराव धोंडे यांची काम करण्याची कार्यपद्धतीच आगळी वेगळी असून मला त्याचा अभिमान आणि विषयक विशेष कौतुकही वाटते असा विशेष उल्लेख करत त्यांना या कामासाठी या पुढे ही शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या