आष्टी (प्रतिनिधी)
माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या माता-पित्याच्या स्मरणार्थ
आयोजित यंदाच्या रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय गंगाई- बाबाजी महोत्सवाच्या मंचावर सौ.
दमयंतीताई भीमराव धोंडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन
प्रा.डॉ.आशा फड- चाटे यांचा शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएच.डी.पदवी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून प्राप्त केल्याबद्दल
विशेष सत्कार करण्यात आला. बुधवारी आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या भव्य मंचावर
राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय स्थान प्राप्त केलेल्या कार्यप्रवण
पुरस्कारार्थी मान्यवरांचा यावेळी माजी आ.भीमराव धोंडे,सौ.दमयंतीताई भीमराव
धोंडे,माजी शिक्षण सभापती नियमत बेग,राजेंद्र धोंडे,अजयदादा धोंडे संतोषभैय्या
चव्हाण,प्राचार्य दत्तात्रय वाघ,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे,
उपसंपादक उत्तम बोडखे,अर्जुनराव घुगे, विविध मान्यवर पत्रकार पदाधिकारी बांधव व
मान्यवरांची उपस्थिती होती. प्रा.डॉ.आशा फड- चाटे यांचे "जोहरा एक: मूल्यांकन" हे
उपन्यास पुस्तक प्रकाशित आहे. "प्रभा खेतान के उपन्यासो मे स्त्री चरित्रों का
अनुशीलन" या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. या सन्मानावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. अजयदादा धोंडे, सौ.अक्षताताई धोंडे, राजेंद्र
धोंडे,माजी सभापती नियामत बेग,माजी सैनिक रणजीत चव्हाण न्यूज १८ लोकमतचे पत्रकार
सुरेश जाधव,प्राचार्य बाळासाहेब खेमनर, प्राचार्य निशिगंध, उपप्राचार्य ज्ञानेश्वर
वैद्य,संतोषभैय्या चव्हाण आदी सह शिक्षण सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, वैचारिक,
सांस्कृतिक क्षेत्रातील गुणीजन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
चौकट
--------
'सावित्री'चा सत्कार
केल्याचा आनंद!
------------------

..
.
"क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले यांच्या जयंतीच्या अर्थात महिला मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर या भव्य
राज्यस्तरीय मंचावर माझ्या हस्ते साहित्य विश्वात मौलिक योगदान देणाऱ्या लेखिका
प्रा.डॉ.आशा फड यांचा झालेला सत्कार एका कष्टाळू 'सावित्री'चा सन्मान असल्याचा आनंद
आणि मनस्वी समाधान वाटले! अशी भावनिक प्रतिक्रिया सौ. दमयंतीताई धोंडे यांनी दिली.
-----------------
0 टिप्पण्या