
आष्टी (प्रतिनिधी)
भव्य दिव्य इमारत..विविध विभागांची अत्यंत सूत्रबद्ध विभागणी...
सुयोग्य नियोजन.. आणि उच्च दर्जांच्या सुविधा... अशा अत्यंत शिक्षण क्षेत्राला
शोभेल अशा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंचावर ते आले.. ते बोलले... आणि सबंध
तरुणाईची मने जिंकली!! असा रोमांचकारी अनुभव अत्यंत टाळ्यांच्या गजरात आणि चैतन्य
वातावरणात येथे आला! शनिवारी आरजेएस प्रतिष्ठानच्या एमबीबीएस कॉलेजच्या व्हाईट कोट
सेरेमनीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सबंध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या
विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेल्या कलेक्टर सागर डोईफोडे यांनी भाषणातून भावी
डॉक्टर बनणाऱ्या तरुणांसाठी मौलिक मार्गदर्शन केले.अस्खलित मराठी भाषा... प्रचंड
आत्मविश्वास मातृभूमीचे प्रेम, राष्ट्राविषयी निष्ठा आणि दिव दमन काश्मीर यासारख्या
भागात अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठा आणि जिद्दीने केलेली प्रशासन सेवा यावरच्या अनेक
उदाहरणां मधून भावी डॉक्टरांना त्यांनी राष्ट्र सेवेचा दिलेला संदेश तरुणाईची मने
जिंकणार होताच; किंबहुना त्यांच्यात नवी चेतना आणि अंगावर शहारे आणणाराही ठरला!
पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या समवेतच्या व्यासपीठावर केलेल्या उत्तम
प्रेरणादायी भाषणाबद्दल बालरोग तज्ञ डॉ. गोरखनाथ नागरगोजे आणि मराठी भाषा विषय
शिक्षक महासंघाच्यावतीने प्रा.बिभिषण चाटे सर यांनी यावेळी आयएएस सागर डोईफोडे
यांचे विशेष कौतुक केले.
चौकट
--------
डॉ.गोरखनाथ नागरगोजे
यांचे सुयोग्य नियोजन
--------------------------
संस्थापक चांगदेव काका कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली
प्राचार्य डॉ.प्रशांत भुसारी यांच्या समवेत शेवगाव येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ
डॉ.गोरखनाथ नागरगोजे यांनी उत्तम नियोजन केले.त्यांचे कौतुक डॉ. सोमीनाथ
बडे,ॲड.संजय सानप, प्रा.बिभिषण चाटे यांनी केले.
--------------------------
0 टिप्पण्या