आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत
राज्यातील शिक्षक व अधिकारी यांच्याकरिता विविध ४३ प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन
करण्यात आलेले आहे.यापैकी 'स्वरचित कविता लेखन व सादरीकरण' या प्रकारांतर्गत
छत्रपती संभाजीनगर विभाग स्तरीय स्पर्धा नुकतीच अंबाजोगाई येथे संपन्न झाली.यासाठी
विभागातील सर्व जिल्ह्यातील निवडक पस्तीस कवींच्या सादरीकरणामधून राज्यस्तरासाठी
पाच कवींची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंज केंद्र
जामगाव येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक सुप्रसिद्ध कवी हरिष नवनाथ हातवटे यांच्या
कविता व सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाला व थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
झालेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल आष्टीच्या गटशिक्षणाधिकारी सीमा काळे,
के.प्रा.शा.जामगावचे मुख्याध्यापक नंदकिशोर होगाडे,पत्रकार उत्तम बोडखे, कवी सय्यद
अल्लाउद्दीन, बापूसाहेब शिंदे, मुख्याध्यापक सल्लाउद्दीन सय्यद,सचिन वारंगुळे
यांच्यासह जामगाव केंद्रातील व आष्टी आणि परिसरातील सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन
केले आहे.
0 टिप्पण्या