आष्टी (प्रतिनिधी)
सर्वसामान्य गोरगरिबांना माणुसकीचा आणि मानवतेचा मंत्र देणारे महान राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज यांचा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळा पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर दि. ३ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये संपन्न होत आहे यावर्षी ५० वी.पुण्यतिथी असल्यामुळे सुवर्ण महोत्सवी महासोहळा साजरा करण्यात येणार आहे.या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळ्यामध्ये ह.भ.प.प्रल्हाद महाराज शास्त्री दैठणकर,विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर बुलढाणा, ह.भ.प. मुकुंद काका जाटदेवळेकर पाथर्डी, ह.भ.प. प्रभाकरदादा बोधले पंढरपूर,
ह.भ.प.जलाल महाराज सय्यद निफाड, महामंडलेश्वर अमृत महाराज जोशी बीड, ह.भ.प. संदीपान महाराज शिंदे (अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आळंदी) आणि शनिवार दि.१० जानेवारी २०२६ रोजी महंत श्री ह.भ.प. विठ्ठल महाराज गहिनीनाथ गडकर यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे किर्तन होईल.त्यामध्ये पुण्यतिथीच्या पुण्यकाळी ११:४५ मिनिटांनी पुष्पवृष्टी होईल व १:३० मिनिटानंतर महाप्रसाद होईल.
या महोत्सव कालावधीमध्ये ज्येष्ठ हरिभक्तिपरायण मान्यवर महाराज यांचे प्रवचन सेवा तसेच संगीत क्षेत्रातील दिग्गज यांची भक्ती संगीत भजनाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न होणार आहे.या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महंत हभप विठ्ठल महाराज यांच्या संकल्पनेतून यावर्षी आठ दिवस हा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न होणार आहे या सर्व आध्यात्मिक कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र गहिनीनाथगड चिंचोली नाथ, आटेगाव पुठ्ठा व परिसर त यांच्यावतीने महंत श्री ह.भ.प. विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या