Ticker

6/recent/ticker-posts

अलौकिक सेवाकार्यामुळे चंद्र-सुर्य असेपर्यंत संत मदन महाराजांना समाज त्यांना विसरणार नाही ......... ह.भ.प.बबन महाराज

-----------------------
उत्तम बोडखे, आष्टी ---------------- संत मदन महाराज हे उघडे परब्रम्ह होते. ते स्वताः उघडे राहिले परंतु ईतरांना कपडे, मायेचे पांघरूण दिले.जगात काहीही मिळेल परंतु संत दुर्लभ आहेत.गुरुकृपेने मी आज तुमच्यापुढे उभा आहे. समाजाला दिशा देण्याचे काम नेहमी संतांनी केले आहे.देव प्रत्यक्ष कोणाला दिसला जरी नसला तरी संतांनी अनुभवाद्वारे देवत्वाची प्रचीती समाजाला दिली आहे.समाजाला अध्यात्मिक मार्गावर ठेवून शांतता सौख्य राखण्याचे मोठे काम संतांनी " गुरु " च्या भूमिकेतून केल्याचे दिसून येते असे सांगत.संत मदन महाराजांनी देहाची कधीच पर्वा केली नाही.त्यांनी देहाचा लाड कधीच केला नाही.याचा साक्षीदार मी असल्याचे सांगून अनेक उदाहरणे देऊन जीवनातील गुरुचे महत्त्व पटवून दिले.हरिनाम सप्ताह सोहळे, ज्ञानेश्वरी पारायणे संत मदन महाराज यांनी या भागात नव्हे मराठवाड्यात अध्यात्मिक कार्य केले.संत मदन महाराज यांनी या भागात ज्ञानेश्वरी पारायणे, हरिनाम सप्ताह सुरु केले. संत मदन महाराज स्वतः उघडे राहुन समाजाला मायेची, भक्तीची ऊब दिली असे प्रतिपादन संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांनी केले. आष्टी तालुक्यातील कडा येथील संतनगरात संत मदन महाराज यांच्या २९ व्या. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित भागवत कथा, हरिनाम सप्ताहातील काल्याचे कीर्तन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी देविदास धस,जयदत्त धस,महेशआजबे,आण्णासाहेब चौधरी,संपत म्हस्के,बाबासाहेब गुंजाळ,ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कराळे,ह.भ.प.निवृत्तीदादा बोडखे,ह.भ.प.विष्णू महाराज लिबोडीकर,ह.भ.प.मोहन महाराज आमटे,निळकंठ महाराज तावरे,दादा महाराज चांगुणे,दिनकर महाराज तांदळे, सभापती रमजान तांबोळी, संजय गाढवे, हनुमानशेठ बिहाणी,भीमराव पाटील, दिपक कर्डीले,युवराज पाटील, सेवानिवृत्त उपअभियंता पी.ई. तळेकर,प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते,सुनिल नाथ,बाबुशेठ भंडारी,विक्रम पोकळे,संदीप खाकाळ,दिपक कर्डीले,पत्रकार उत्तम बोडखे,रघुनाथ कर्डीले, नागेश कर्डीले,सभापती संजयनाना ढोबळे,गोरख कर्डीले,प्रा.डाॕ.शाम सांगळे, संतोष भंडारी,सुभाषमामा सोनवणे,पांडुतात्या चौधरी, रोहिदास कर्डीले,बाळासाहेब कर्डीले,बाळासाहेब निकम, कुंडलीक आमटे,बाबासाहेब मुळीक,शिवाजी पाचे, भाऊसाहेब भोजने,सुनिल देशमुख,सुदामकाका झिंजुर्के, प्रा.सुभाष रासकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल पुढे बोलताना म्हणाले की,केवळ शिक्षण घेतल्यामुळे सुशिक्षित मिळवणारे स्वतःच्या सुखासाठी आपल्या जन्मदात्या वयोवृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणारे,चांगली आर्थिक परिस्थिती असणारे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यापेक्षा दुष्काळात निसर्गाशी झगडून देखील कष्ट करणारा शेतकरी वर्ग आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत नाही. शेतकरीच खरा श्रीमंत आहे कारण तो आई वडीलांना वृध्दाश्रमात पाठवत नाही.ज्या देशात प्रभु रामचंद्र सावत्र मातेच्या आदेशाने वनवासात गेला त्याच देशात आज काय चित्र आहे ? ज्या दिवशी हिंदुस्थानात पहिला वृध्दाश्रम सुरु झाला त्यादिवशी धरणीमाय थरथर कापली असेल असे सांगत संत हेच समाजाचे सर्वश्रेष्ठ गुरु असतात. संत हे देव आणि समाजामध्ये दुवा निर्माण करतात.संत मदन महाराज बिहाणी यांनी निरलसपणे मार्गदर्शन करताना स्वतः उघडे राहुन समाजाला मायेची,भक्तीची ऊब दिली. त्यांनी स्वतः लग्न केले नाही पण हजारो लग्न लावून दिले,ते स्वतः उपाशी राहीले पण वसतिगृह सुरू करुन अनाथ मुलांना घास भरवला,त्यांनी देहाची पर्वा न करता परमार्थ केला.संत मदन महाराज बिहाणी यांंच्या अलौकिक सेवाकार्यामुळे चंद्र- सुर्य असेपर्यत समाज त्यांना विसरणार नाही असे सांगीतले. वमनची जीतकी घृणा वाटते तीतकी घृणा संसाराविषयी वाटणारा साधक असतो.४० वर्षापूर्वी सासु व सुना,मालक व गडी यांच्यात काय व कसे नाते होते आणि आज यांच्यात कसे नाते आहे.भजन कीर्तनास गर्दी नसे आज कीर्तनात बसायला जागा मिळत नाही.एकूणच आध्यात्मिक प्रचंड प्रेम निर्माण करत त्याविषयी गोडी निर्माण करण्याचे अध्यात्मिक कार्य वै. संत मदन महाराज यांनी केलेले आहे.समाजात पामर, विषयी, मुमुक्षु (जिज्ञासु) आणि ज्ञानी असे चार वर्ग असतात.सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे.सेवा केल्याने स्वामी होतो.पाप जास्त झाले की,अधोगती होते.जास्त पुण्याने उत्तम गती मिळते. ममुक्षु,जिज्ञासु आणि साधक साधकाची दशा उदास असावी लागते.मंद ममुक्षु आणि तिव्र ममुक्षु हे ममुक्षुचे दोन प्रकार आहेत.परमार्थात प्रवेश करताना चिरंजीव पदापासुन करावा लगतो.मोक्ष म्हणजे मोकळं होणं.मोकळं होणं हे सांगणं सोप आहे पण मोकळं होणे खुप अवघड आहे.काहीच उपाधी नसणे म्हणजे मोक्ष. समाजात पामर,विषयी,मुमुक्षु -जिज्ञासु आणि ज्ञानी हे चार वर्ग असेही ह.भ.प.बबन महाराज म्हणाले.पद,पैसा व प्रतिष्ठेच्या पाठीमागे लगणारा गुरु होण्याच्या लायकीचा नसतो.सावध होऊन भजनाला, भक्तीला लागावे असे जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी सामान्यांना सांगीतलेले आहे. प्रसिद्धी,प्रतिष्ठेच्या आणि पैशाच्या मागे लागणारा गुरु व संत होऊ शकत नाही.शरीर आपल्या ताब्यात असेपर्यत, आयुष्य शिल्लक असेपर्यत आणि इंद्रिये ताब्यात असेपर्यत माणसाने सावध होणे गरजेचे असते असेही ह.भ.प.बबन महाराज म्हणाले. ---------------------- चौकट ---------- आष्टी येथील सुभाष रासकर सर यांनी सप्ताहास ५१ हजार रु देणगी दिल्याबद्दल तसेच महापंगत दिलेल्या भाविक भक्तांचा सत्कार करण्यात आला. ------- ही पंगत वाढ करण्याचे काम श्रीराम विद्यालय,मोतीलाल कोठारी विद्यालय,भगिनी निवेदिता विद्यालय, जि.प. शाळेतील मुलांनी महाप्रसाद वाढ करण्याचे काम केले. ---------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या