Ticker

6/recent/ticker-posts

मातकुळी येथील श्रीकृष्ण विद्यालयाची कु. सृष्टी प्रमोद ओव्हाळ ३३ किलो वजन गटात राज्यात सर्वप्रथम ... दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

आष्टी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य क्रीडा व माहिती संचानालय मुंबई महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आज मंगळवारी सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मातकुळी या शाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. सृष्टी प्रमोद ओव्हाळ ही १४ वर्ष वयोगटात व ३३ किलो वजन गट यामध्ये राज्यातून सर्वप्रथम आली आहे.तिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची निवड झाली आहे. राज्यातून प्रथम क्रमांकाने विजयी झाली असुन तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबद्दल राष्ट्रीय कुस्ती खेळाडू कु. सृष्टी ओव्हाळ व शाळेचे मुख्याध्यापक तथा क्रीडा मार्गदर्शक श्री अशोक डोके सर यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. भीमराव धोंडे, प्रशासन अधिकारी डॉ.डी. बी. राऊत सर, श्री शिवदास विधाते सर, श्री माऊली बोडखे सर, श्री संदीप ननवरे सर, श्री सागर वाघुले सर, श्री संजय शेंडे सर, यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या