
आष्टी (प्रतिनिधी)
सुर्य,हवा,पाणी,निसर्ग हे श्रीमंत व गरीबांना समान न्याय देत
असतो. आईचे हृदय सर्व मुलासांठी समान प्रेम देणारे असते. मातेचे हृदय संतासारखे
असते.संत भक्ती करतात आणि देव अनेक अवतार घेऊन चरित्र करतात.अलौकिक कार्य
करणाऱ्यांचे अलौकिक कार्य आहे.संत व देवाचे चरित्र असते अलौकिक कार्य करणाऱ्यांचेच
चरित्र होत असते.आष्टी येथील आदर्श माता सौ.देवकी अनंत हंबर्डे यांचे कार्य
कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन धर्मभूषण ह.भ.प.मच्छिंद्र महाराज राऊतदादा यांनी
केले. आष्टी येथील सौ.देवकी अनंत हंबर्डे यांच्या दशक्रिया विधी निमित्त ते प्रवचन
सेवेत बोलत होते.ह.भ.प.राऊत दादा पुढे म्हणाले की,जशी शरीराने, जीवाने व संपत्ती
खर्चूनही आई आपल्या बालकाचे भरण पोषण करते.भरण पोषण करते तरी तिला पालनाच्या
कष्टाचा कंटाळा आला असे कधी होत नाही. एका यशस्वी पुरुषाचे मागे महिलाचा सिंहाचा
वाटा असतो कै. देवकी अनंत हंबर्डे ह्या शांत, संयमी, मनमिळावू व प्रेमळ
व्यक्तिमत्वाच्या होत्या. कौटुंबिक जीवनात सर्वच जावयावर मुलाप्रमाणे प्रेम केले.
मुलीवर हे चांगल्या प्रकारे संस्कार केले. शेवटपर्यंत चांगली स्मरणशक्ती होती.
भेटीसाठी आलेल्यांना आग्रहाचे पाणी,नाश्ता,प्रसंगी जेवण केल्याशिवाय या मातेने जाऊ
दिले नाही.सर्वच मुलीना सुशिक्षित करून सर्व मुलींची विवाह हे चांगल्या घराण्यात
लावले आहेत.अनंत हंबर्डे सर व त्यांच्या पत्नी या आत्ताच्या काळातल्या सावित्री आणि
ज्योतिबात असल्याचे मत ह.भ. प.मच्छिंद्र महाराज राऊतदादा यांनी व्यक्त केले. यावेळी
ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज म्हणाले की, या मृत्युलोकातला नियम असा आहे एकट्यालाच
यावे लागते एकट्यालाच जावे ही लागते. या यहलोकांमध्ये आयुष्य संपल्यानंतर राहता येत
नाही. जन्मानंतरच काही गोष्टी जीव बरोबर घेऊन आलेला आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट
म्हणजे आयुष्य.. आयुष्य संपल्यानंतर येथे राहता येत नाही.आयुष्य संपल्यानंतर औषधही
काम करीत नाही असे ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराजांनी सांगितले. यावेळी ह.भ.प.
निवृत्तीदादा बोडखे म्हणाले की, अनंत हंबर्डेसर कळस असतील पण त्यांच्या जीवनातला
पाया ह्या त्यांच्या पत्नी देवकीबाई हंबर्डे या आहेत. हंबर्डेसरांचा स्वभाव करारी
आहे तरी त्यांना समजून त्या अर्धांगिनीने घेतले देवकीबाई हंबर्डे यांच्याही
कौटुंबिक कार्याची दखल घेतली पाहिजे असे सांगितले. यावेळी मारुती भुकन,माजी सरपंच
नामदेव राऊत, समाजसेवक विजय गोल्हार, डॉ. बाळासाहेब बळे,सुखलाल मुथा,रत्नदीप
निकाळजे, पत्रकार सिताराम पोकळे, माजी सरपंच रावसाहेब भस्मे, पत्रकार उत्तम
बोडखे,चेअरमन संजय गाढवे,डॉ. विलासराव सोनवणे दिनकरराव तांदळे महाराज ,प्राचार्य
डॉ.हरिदास विधाते, प्राचार्य डॉ. बाळासाहेब खेमगर,राजेंद्र धोंडे, किशोरनाना
हंबर्डे,वरिष्ठ पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर माऊली वाघ, वाल्मीकतात्या निकाळजे,
सतीशआबा शिंदे,माजी आ. साहेबराव दरेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी
क्रांतीनानी चौधरी, रावसाहेब लोखंडे,विवेकभैय्या चौधरी,माजी सभापती अंकुश
चव्हाण,नायब तहसीलदार भगीरथ धारक,अशोक साळवे, संजयनाना ढोबळे,सुभाष रासकर, अशोक
डोके सर,अनंत चौधरी,ज्ञानेश्वर वाघ, श्रीरंग सातपुते, भीमराज कारले, जालिंदर
तांबे,माधवराव तांबे,कुंडलिक आमटे,बाबासाहेब मुळीक,तानाजी हंबर्डे,दीपक
निकाळजे,बा.म. पवार,गो.बा.ज्ञानदेव राऊत,राम हंबर्डे,देविदास चाळक आदि मान्यवर
उपस्थित होते. -----------------
0 टिप्पण्या