आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षितिजावर दैदिप्यमान कामगिरी करून
समता,बंधुत्व, ऐक्य आणि सर्व धर्म सम भावाबरोबरच संविधानाचा जागर करणाऱ्या शाहीर
शीतल साठे आणि सचिन माळी यांचा बोडखे परिवाराच्यावतीने आणि पत्रकार संघाच्यावतीने
आष्टी येथे एका कार्यक्रमाच्या मंचावर सत्कार करण्यात आला. आष्टी,पाटोदा,शिरूर
मतदार संघाचे माजी आमदार तथा शेतकरी नेते भीमराव धोंडे यांच्या माता पित्यांच्या
स्मृतीनिमित्त होणाऱ्या यंदाच्या भगवान महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावरील
राज्यस्तरीय कला महोत्सवाच्या मंचावर शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी यांनी अत्यंत
बहारदार गीत गायनातून समतेचा जागर हजारो रसिक होते आणि युवकांसमोर सादर केला प्रचंड
टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना यावेळी अष्टीकारांनी प्रतिसाद दिला.दरम्यान यानंतर
याच गंगाई -बाबाजी राज्यस्तरीय कला महोत्सवाच्या पवित्र क्रांतिकारी मंचावर शाहीर
शीतल साठे आणि सचिन माळी यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल
सहस्त्रबुद्धे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा जेष्ठ
पत्रकार दत्ताभाऊ काकडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार प्रविण पोकळे,पत्रकार
भीमराव गुरव, पत्रकार रघुनाथ कर्डीले, पत्रकार शरद तळेकर,पत्रकार विनोद ढोबळे,
पत्रकार शरद रेडेकर,पत्रकार संतोष सानप, पत्रकार गणेश दळवी,पत्रकार सचिन रानडे,
पत्रकार मनोज पोकळे,अविशांत कुमकर,अक्षय विधाते,अण्णा साबळे, नागरगोजे,आदी
पत्रकार,जेष्ठ पत्रकार उपसंपादक उत्तम बोडखे आणि त्यांच्या सौभाग्यवती शिक्षिका
श्रीमती बबीताताई बोडखे यांनी यथोचित सत्कार केला.यावेळी शाहीर शीतल साठे आणि सचिन
माळी यांनी आपल्या सारख्या शिक्षण क्षेत्रातील आणि पत्रकारिता क्षेत्रातील
बुद्धिवांतांनी केलेला सत्कार सन्मान हा आमच्यासाठी राज्याच्या क्षितिजावर
क्रांतिकारी गायनातून समता आणि बंधुत्वाची पेरणी करण्यासाठी नवी ऊर्जा निर्माण
करणारा असेल अशी भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
चौकट
---------


शाहीर शितल साठे व सचिन माळी हे आष्टी येथे गंगाई- बाबाजी राज्यस्तरीय कला महोत्सवा
निमित्त आले असता झुंजारनेताचे उपसंपादक उत्तम बोडखे व सौ.बबीता बोडखे यांनी स्वागत
केला.दरम्यान,हा सत्कार माजी आ.भीमराव धोंडे यांच्या माध्यमातून आयोजित गंगाई -
बाबाजी राज्यस्तरीय कला महोत्सवाच्या मंचावरील पवित्र क्रांतिकारी असून नवी ऊर्जा
देणारा आहे! असे भावनिक मत शाहीर शितल साठे आणि सचिन माळी यांनी व्यक्त केले.
---------------
0 टिप्पण्या