Ticker

6/recent/ticker-posts

कवयित्री श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन यांना जिजाऊ माँसाहेब आदर्श साहित्य पुरस्कार जाहीर

आष्टी (प्रतिनिधी) मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषद आष्टी यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जिजाऊ माँसाहेब आदर्श पुरस्कार प्रदान केला जातो.यावर्षीचा हा मानाचा पुरस्कार श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन यांना जिजाऊ माँसाहेब आदर्श साहित्य पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार विधिज्ञ सिताराम पोकळे यांनी दिली. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या प्रकाशित पुस्तकाची आणि कथा कविता लेखनाची दखल घेऊन त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन यांनी आजपर्यंत अनेक कवी संमेलन, कथा संमेलनात सहभाग घेतला आहे.त्याचप्रमाणे राज्यस्तरीय निबंध लेखन,कथालेखन, चारोळी लेखन या स्पर्धेत विजेते पारितोषिक मिळवली आहे. त्यांची आकाशवाणी रेडियो केंद्र बीडने अंतर्गत अनेक वेळा कथा,कविता,लेख प्रसारित केले आहे. यापूर्वी आसराबाई लोखंडे आदर्श साहित्यिक पुरस्कार, साने गुरुजी आदर्श साहित्यिक पुरस्कार आणि गंगाई - बाबाजी राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार मिळालेले आहेत.कवयित्री श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन यांनी फुलांची शाळा हा बालकाव्यसंग्रह आणि अधुरे स्वप्न हा कथासंग्रह लिहलेला आहे.हे दोन्ही पुस्तके पुरस्कार प्राप्त आहेत.त्यांचे दिवाळी अंकात तसेच जीवन शिक्षण मासिक जीवन गौरव मासिक विविध मासिकातून वर्तमानपत्रात कविता,कथा आणि लेख प्रकाशित झालेले आहेत.या पुरस्कारासाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या