

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील भवरवाडी जिल्हा परिषद शाळेत पद्मश्री
पुरस्कार प्राप्त सुलेखक अच्युत पालव यांची दोन दिवसीय सुलेखन कार्यशाळा उत्साहात
संपन्न झाली.तालुक्यातील भवरवाडी येथे भारतीय सुलेखन कलेचे प्रख्यात जनक आणि
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अच्युत पालव यांनी शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुलेखन व हस्ताक्षर सुधारणा कार्यशाळा
घेतली.कॅलिग्राफी या कलेला जागतिक पातळीवर लोकप्रिय करण्यामध्ये मोठा वाटा असलेल्या
पालव यांनी विद्यार्थ्यांना सुलेखनाचे बारकावे,भारतीय लिपींचे सौंदर्य आणि
हस्ताक्षर सुधारण्याच्या विविध तंत्रांची सखोल माहिती दिली.यावेळी त्यांच्या समवेत
सौ.श्रद्धा अच्युत पालव,श्रीमती तेजस्विनी भावे या देखील उपस्थित होत्या.चार
दशकांहून अधिक काळ भारतीय लिपी व सुलेखनाची सेवा करणारे अच्युत पालव यांनी या
कार्यशाळेत मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधत सुलेखनाची मूलभूत तत्त्वे,अक्षररचना, रेषा
नियंत्रण,विविध लेखणींचा वापर,सौंदर्यपूर्ण अक्षर निर्मितीचे अभ्यासपूर्ण
प्रात्यक्षिक दाखवले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध लिप्यांचे
प्रयोग करून आपली सर्जनशीलता अनुभवली.या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना
सुलेखनाच्या कलेची ओळख करून देणे, त्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा घडवून आणणे आणि
भविष्यात शिक्षणासह इतर क्षेत्रांमध्येही या कौशल्याचा फायदा व्हावा हा होता.
कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली आणि अनेकांनी
प्रथमच अनुभवल्या जाणाऱ्या या कलेबद्दल मोठा उत्साह व्यक्त केला.कार्यक्रमाच्या
शेवटी पालव यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना सातत्याने सराव
करण्याचे आणि आपल्या अक्षरांमधून स्वतःची ओळख निर्माण करण्याचे प्रेरणादायी संदेश
दिले.शाळेच्या शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अच्युत पालव यांचे आभार मानले.
या दोन दिवसीय कार्यशाळेमुळे भवरवाडी येथील विद्यार्थ्यांना सुलेखनकलेची अनोखी ओळख
मिळाली असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि शिक्षणात त्याचा सकारात्मक
परिणाम होणार असल्याचे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले.यावेळी सरपंच भरत भवर,
संतोष भवर,संजय भवर,राम भवर, संतोष मोरे,हंसराज महाराज,जालिंदर भवर,दिलीप बागल अशोक
भवर,शरद बागल,सतीश भवर,सचिन भवर,शिवाजी भवर, रोहन भवर,महेश भवर,जयेश भवर, सागर भवर,
तुळशीराम भवर, सार्थक भवर,पोपट भवर शाळेचे मुख्याध्यापक काकडे सर,अनिल बेद्रे,
पत्रकार उत्तम बोडखे,नगरसेवक दीपक निकाळजे, राजेंद्र लाड,सचिन रानडे,शरद गर्जे आदी
उपस्थित होते.आष्टी तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा भवरवाडी (किन्ही) या शाळेत पहिली ते
चौथी या चार वर्गात ३० विद्यार्थी आहेत.येथे मुख्याध्यापक सुनिल काकडे तर सहशिक्षक
म्हणून अनिल बेद्रे आहेत. बेद्रे हे शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर सर्व विद्यार्थीचे
सुंदर हस्ताक्षर होण्यासाठी विशेष परिश्रम घेतात. शाळेतील विद्यार्थीची चाचणी घेत
शैक्षणिक गुणवत्ता तपासली.या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे सुंदर हस्ताक्षर आहे.
पाठांतर,पाठे पाठांतर,ईग्रंजी वाचन चांगले आहे.प्राथमिक शिक्षण दर्जेदार मिळत आहे.
शाळेतील सर्व विद्यार्थीना कॕलेग्राफीसाठी ३०० रु किंमतीचे पेन सरपंच भरत भवर यांनी
दिले आहेत.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण भवर,संतोष भवर आदि
उपस्थित होते.येथे ६० वर्षापूर्वीची जुनाट आशी दोन खोल्यांची शाळेची ईमारत आहे. ही
ईमारत विद्यार्थीना बसण्यायोग्य नाही. येथे नवीन इमारत बांधकाम सुरु आहे. शाळेतील
विद्यार्थीचा दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला जातो.१०० ते १२५ घरे असलेली
ही वाडी आहे.मात्र जागरुक पालकांमुळे प्राथमिक शाळेत दर्जेदार ज्ञानदानाचे कार्य
शिक्षक करत आहेत,ग्रामस्थांचा लोकसहभाग व शाळेला मदत करण्याची भुमीका असल्याने
विविध शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात. पालक, ग्रामस्थांच्या सहभागातुन
शाळेत नुकतीच शिवजयंती साजरी झाली. यानिमित्ताने तीन तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम
झाला. यावेळी पालक व ग्रामस्थांनी सढळ हाताने विद्यार्थीना बक्षीसे दिले.सरपंच ज्या
शाळा खोलीत शिकले ती ईमारत आता नादुरुस्त झाल्याने येथे सुमारे १५ ते २० लाख रु
खर्चुन दोन खोल्या स्लॕबच्या आरसीसीच्या बांधण्याचा सरपंच भरत भवर, उपसरपंच ,
ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांचा प्रयत्न सुरु आहे. मुख्याध्यापक सुनिल काकडे हे ९
वर्षापासून या शाळेत आहेत.सहा महिन्याने ते सेवानिवृत्त होणार आहेत तर बेद्रे सर हे
तीन वर्षापासुन येथे कार्यरत आहेत. भवरवाडीची प्राथमिक शाळा ही मोत्यांच्या
अक्षरांची शाळा! असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
चौकट
--------
सुंदर
हस्ताक्षरासाठी
विशेष परिश्रम!
-------------------
मुख्याध्यापक सुनिल काकडे
सरांच्या मार्गदर्शनाखाली अनिल बेंद्रे सरांनी विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर
सुधारण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.अधिकचा एक तास दिल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे
जवळपास हस्ताक्षर सुंदर झाले. --------------
0 टिप्पण्या