
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी
महाविद्यालय व कडा येथील श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने नवनाथ
धुमाळ यांचे आज आज गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी युवकांनो ऊद्जोजक व्हा या
विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन
समितीने केले आहे. उद्योजक एन.बी. धुमाळ हे अहिल्यानगर येथील वक्ता आणि लेखक
आहेत.यशस्विता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि मी यशस्वी होणारच.हे ब्रीद मनाशी
धरून,बडी सोच,कडी मेहनत आणि इराद्याने वयाच्या १६ व्या. वर्षापर्यंत सात-आठ
कि.मी.मध्ये असलेले एन.बी. धुमाळ यांनी ४५ व्या. वर्षापर्यंत ४५ देशांना भेटी
दिल्या आहेत. श्री एन. बी. धुमाळ यांचा जन्म बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा या
गावी १९५७ साली शेतकरी आणि धार्मिक कुटुंबात झाला.जुनी ११ वी. पर्यंतचे शिक्षण
अमोलक विद्यालय कडा येथे त्यानंतर बीएस.सी, एमएससी,एल.एल. बी. संभाजीनगर मध्ये
झाले.स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १९७९ ते १९९२ पर्यंत १३ वर्ष अधिकारी पदावर नोकरी
केली. १९९२ साली ११ हजार रुपये पगाराची सरकारी सरकारी नोकरी सोडून व्यवसायामध्ये
पदार्पण केले.१९९२ ते २०१४ पर्यंत उद्योग,लाईफ लाईन लाईफ केअर लिमिटेड कंपनी सुरू
करून विमा सेवा उद्योग केला. महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र,मध्यप्रदेश, गुजरात आणि
गोवा या राज्यामध्ये स्वतःच्या कंपनीचे १७ ऑफिसेस व एजंटांच्या माध्यमातून ४७ लाख
लोकांना भारत सरकारचां टर्म इन्शुरन्स (६० रुपयात एक लाखाचा नॉन रिफंडेबल इन्शुरन्स
हा शेतकरी, शेतमजूर,महिला ) यांना विकण्याचं काम त्यांच्या लाईफ लाईन कंपनीने केलं.
त्यामधून ३७ हजार कुटुंबात मृत्यू किंवा अपंगत्व अशा दुर्दैवी घटना घडल्या. त्या
माध्यमातून ४५ करोड रुपयाचे क्लेम हे त्या वारसदार माता भगिनी पर्यंत पोहोचवण्याचे
भाग्य एन.बी.धुमाळ यांना लाभले आहे.१९९२ पासून जिल्हा उद्योग केंद्रामध्ये फॅकल्टी
म्हणून अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नाशिक या ठिकाणी नवीन उद्योजकांना ट्रेनिंग
देण्याचे काम केले.१९९४ ते २०१४ पर्यंत ५ हजार नवउद्योजक स्वतःच्या पायावर उभे केले
आहेत. जेम ऑफ इंडिया (भारताचा हिरा) ऑल इंडिया अचीवर्स कॉन्फरन्स नवी दिल्ली,
इंटरनॅशनल क्वालिटी एक्सलन्स अवॉर्ड नवी दिल्ली, प्राइड ऑफ महाराष्ट्र अवार्ड.
दिव्य मराठी भास्कर ग्रुप, दैनिक सकाळचा एक्सलन्स अवार्ड आदी पुरस्काराने त्यांना
सन्मानित करण्यात आले आहे.'मूळचे शेतकरी असलेले धुमाळ यांनी अनेक उद्योगांमध्ये
प्रचंड यश मिळवले आहे. अहिल्यानगर येथे थ्री स्टार कॅटेगिरी चे हॉटेल सुवर्णम
प्राइड, हॉटेल सुवर्ण सुवर्णम रेसिडेन्सी, हॉटेल सुवर्ण भोज असे तीन हॉटेल्स, लाईफ
लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल,एलपीजी गॅस पंप,धुमाळ टॉवर नावाचं कमर्शियल प्रोजेक्ट
आदी व्यवसायामध्ये प्रचंड यश मिळवल्यानंतर २०१५ सालापासून ते सामाजिक कार्य करत
आहेत. २०२१ साली "यशस्वीतेचा सुवर्णमंत्र" हे पुस्तक लिहिले असून राजहंस प्रकाशन
पुणे यानी ते प्रकाशित केलेले आहे.२०२३ ला "यशाचे १११ मंत्र" हे पुस्तक प्रकाशित
केले असून त्याच्या १५ हजार प्रती शाळा महाविद्यालयातील ग्रंथालयाला आणि सार्वजनिक
वाचनालयाला मोफत भेट म्हणून दिल्या आहेत एन. बी.धुमाळ चॅरिटेबल फाउंडेशन (NGO)च्या
माध्यमातून १000 मुले दत्तक घेऊन त्यांना उद्योजक बनवण्याचे काम ते करीत आहेत.
त्यासाठी त्यांनी स्वतःचे एक करोड रुपये या फाउंडेशनला देणगी दिलेली आहे.श्री धुमाळ
यांनी कोरोना काळात स्वतःचे २७ लाख रुपये खर्च करून नगर शहरात ५० हजारापेक्षा जास्त
जेवणाचे डबे मोफत वाटले असून मागील सात वर्षापासून ते त्यांच्या माता-पित्याच्या
स्मरणार्थ हॉटेल सुवर्णम प्राइड तारकपूर, अहिल्यानगर येथे अन्नछत्र चालवीत आहेत.
अहमदनगरच्या तारकपूर परिसरामध्ये अनेक मोठमोठी हॉस्पिटल्स असल्याने हॉस्पिटल मधील
नातेवाईक व गोरगरिबांना ते दररोज दुपारी मोफत जेवण देण्याचं कामही ते करीत आहेत.
सकाळी नाममात्र ५ रुपयात चहा आणि १० रुपयात नाश्ता आणि संध्याकाळी फक्त २५ रुपयात
जेवण देत आहेत. हॉस्पिटल मधील पेशंटच्या नातेवाईकांना राहण्यासाठी नाम मात्र रकमेत
राहण्याची सोय केलेली आहे.बँकिंग, इन्शुरन्स,फायनान्स आणि इतर छोट्या मोठ्या
उद्योजकांना ते यशस्वी उद्योग कसा करावा याचे ट्रेनिंगही ते देत आहेत.महाराष्ट्रात
अहिल्यानगर मधून सर्व प्रथम लग्न आचारसंहिता आणि आर्थिक साक्षरता सुरू केली आहे.
उद्याचा युवक हा संस्कारी आणि स्वावलंबी व कौशल्य विकसित व्हावा म्हणून त्यांनी
शेकडो,शाळा, महाविद्यालयातील युवकांना " विद्यार्थ्यांच्या यशाचा मंत्र " या
विषयावर व्याख्यान दिलेले आहेत, त्या अनेक शाळा,महाविद्यालात विद्यार्थ्यांना लागू
असलेले यशाचे मंत्र वाचुन दाखवले जातात.
0 टिप्पण्या