Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण जीवन व मराठी साहित्याशी दृढ नाते ठेवणाऱ्या डॉ.मनीषा रिठे

...उभ्या महाराष्ट्राला ज्ञानगंगाचे पावन दर्शन कर्मवीर भाऊराव पाटलांनी दिले. शिक्षणातून माणसांची न संपणारी पूजा आरंभिली किंबहुना त्यांनी सर्वसामान्य बहुजनांसाठी ज्ञानाची पानपोईच उघडली! त्यांच्या महान कार्याला स्मरूण आजही अनेक जण सर्वसामान्यांच्या हितासाठी.. त्यांनी शिकून मोठे व्हावे यासाठी... शिक्षण क्षेत्रात कवी लेखक निवेदक शिक्षक प्राध्यापकांच्या भूमिकेत कार्यरत राहून सेवा करत असलेले आणि धडपड असलेले व्यक्तिमत्व दुर्मिळ का होईना पाहायला मिळते! मराठी भाषा ही ज्ञानभाषा आहे.ती आत्म्याची सुद्धा भाषा आहे म्हणून या भाषेच्या प्रगतीसाठी उत्थान व संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी भाषा विषय शिक्षक महासंघाच्यावतीने राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील मराठी भाषेचे प्राध्यापक धडपडताना दिसतात.यातीलच एक नाव म्हणजे डॉ.मनीषा रिठे! ------------- विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी प्रकार देण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून गेली अनेक दशके सुरू आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मराठी भाषेच्या अध्यापिका म्हणून कर्तव्य बजावताना त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान नाही; तर जगण्याची दृष्टीही मुलांना दिली आहे.लेखन कार्य प्रभावी, चिंतनशील आणि अंतर्मुख करणारे आहेच; किंबहुना मानवी समाज व्यवस्थेला दिशा देण्याचे ही कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. एक प्रतिभाषाली शिक्षिका, कवयित्री लेखिका निवेदिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही त्यांचे स्थान आज शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे.मराठी साहित्यात त्यांनी संशोधन करत विद्यावाचस्पती अर्थात पीएच.डी.पदवी संपादन केलेली आहे. त्यांची "तिफन;एक कातर संवेदन" आणि ग्रामीण कवितेचा नवा आयाम: जहर खाऊ नका!" हे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. 'ओंजळ' नावाचे पुस्तक प्रकाशित असून वाचकांसाठी लोकप्रिय ठरलेले आहे. त्यांची लेखन भाषण आणि जागृती करण्याची तळमळ या सर्व सकारात्मक बाबी आहेत. संघटनांच्या माध्यमातून दुर्बल घटक आणि महिलांसाठी त्यांचे विशेष कार्य आहे. त्यांचे जीवनपट कार्य व संघर्ष... महिला व युवतींसाठी प्रेरणेचे स्थान बनले आहे. नुकतीच त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत हे सहभाग नोंदवत महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. चौकट -------- लेखन प्रभावी, चिंतनशील आणि अंतर्मुख करणारे! ---------------------- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी भाषा विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.सुनील डिसले, राज्य कार्याध्यक्ष प्रा.संपतराव गर्जे,राज्य सचिव प्रा. बाळासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्ष डॉ. आत्माराम झिंजुर्डे, कार्याध्यक्ष डॉ.अशोक देवगुडे आणि बीड जिल्हा सचिव प्रा.बिभिषण चाटे यांनी डॉ. मनीषा रिठे यांच्या योगदानाला सदिच्छा दिल्या आहेत. ----प्रा.बिभिषण चाटे. ( बीड जिल्हा सचिव, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ ) -----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या