Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्यदायी मातीने शेती उत्पादनक्षमता वाढेल, अन्नसुरक्षा सक्षम होईल ....... प्राचार्य डॉ.श्रीराम आरसूळ

आष्टी (प्रतिनिधी) माती आरोग्यदायी असेल तरच शेती उत्पादनक्षमता वाढेल आणि भविष्यातील अन्नसुरक्षा सक्षम होईल असे प्रतिपादन छत्रपती शाहू,फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम आरसूळ यांनी केले आष्टी येथील श्री छत्रपती शाहू, फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयात येथे ५ डिसेंबर जागतिक मृदा दिन २०२५ उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास डॉ.डी.बी. राऊत,प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ, प्रा.जी.जे.नवसरे, प्रा.पी.आर.काळे,इंजि.प्रा.पी. एन.जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे प्रा.देसाईपाटील एस.आर.यांनी सुत्रसंचालन व उद्घाटनपर भाषणाने झाली.त्यांनी जागतिक मृदा दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना माती संवर्धनाबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांसाठी क्विझ स्पर्धेचे आयोजन ------------------- जागतिक मृदा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ज्ञानपर क्विझ स्पर्धा घेण्यात आली.त्यात मुलांच्या गटात— लाखाडे विठ्ठल – प्रथम क्रमांक, गुंड सुहास – द्वितीय क्रमांक, मुलींच्या गटात— घुले प्रांजल – प्रथम क्रमांक, झाडे शिवानी – द्वितीय क्रमांक,विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक व बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले.प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे फायदे, मृदा आरोग्याचे महत्त्व, तसेच शाश्वत कृषी पद्धतींची गरज यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. श्रीमती एस.ए.शिंदे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थी,प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.मृदा संवर्धन, सेंद्रिय शेती आणि शाश्वत कृषीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम यशस्वी ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या