
आष्टी (प्रतिनिधी)
मराठा सेवा संघ प्रणीत तानुबाई बिरजे पत्रकार परिषद आष्टी
यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जिजाऊ
माँसाहेब आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षीचा हा मानाचा पुरस्कार
आष्टी तालुक्यातील क-हेवडगाव येथील सरपंच तथा कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
संचालिका सौ.वंदना परिवंत गायकवाड यांना जाहीर झाला असल्याची माहिती ज्येष्ठ
पत्रकार सीताराम पोकळे यांनी दिली. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील त्यांच्या
सातत्यपूर्ण २५ वर्षाच्या आणि प्रभावी कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी
निवड करण्यात आली आहे.सौ. वंदना गायकवाड यांच्या निवडीबद्दल आ.सुरेश धस, माजी
सभापती अरुणभैय्या निकाळजे,कड्याचे माजी सरपंच रामशेठ मधुरकर, माजी नगरसेवक सादिक
कुरेशी,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,डाॕ.युवराज तुपे,सेवानिवृत पोलीस निरीक्षक मिलींद
निकाळजे, माजी नगरसेवक दिपक निकाळजे, नाट्यकलावंत दिग्दर्शक रुपेश निकाळजे,राजेंद्र
बोरुडे,सोमीनाथ विधाते,दिलीप राऊत यांच्यासह सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले
आहे. सौ.गायकवाड यांची आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पवित्र विधायक
कार्य आपल्या हातुन होत आहे.असेच आपल्या हातून निरंतर घडत राहो. आपल्या
उल्लेखनीय,प्रभावी कार्यातून एक सक्षम राष्ट्राच्या प्रस्थापनेचा प्रवाह भक्कम होऊन
सखोल मानवीय अंतर्मनाचा चेहरा प्रफुल्लित सन्मुख होतो.तुम्ही कार्यरत असलेल्या
क्षेत्रात तुम्ही तुमच्या कार्याचा ठसा उमटवला आहेच. आपल्या हातून होत असलेली
राष्ट्रसेवा ही खरोखरंच अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे.
चौकट
--------
कष्टाची
जाणीव व सत्याची कास!
-----------------
मेहनत,सातत्याने सर्वसामान्यांच्या
प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेऊन चालतांना कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये
नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना नक्कीच प्रेरणा मिळते. दरम्यान,सरपंच सौ.वंदना
परिवंत गायकवाड यांना पुरस्कार जाहिर झाल्याबद्द त्यांचे मित्रपरिवार व
मान्यवराकडून अभिनंदन होत आहे.
-----------------
0 टिप्पण्या