आष्टी (प्रतिनिधी)
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे आष्टी येथील भगवान महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालयाच्या वतीने आयोजित गंगाई –बाबाजी कला रौप्य महोत्सव २०२५–२०२६’ अंतर्गत विविध क्षेत्रांतील मान्यवरांना राज्यस्तरीय ‘गंगाई–बाबाजी आदर्श पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.बीड जिल्ह्यातील राजकारणातील पितामह भीष्म म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री शिवाजीराव पंडित (दादा) यांना गंगाई बाबाजी रौप्य महोत्सवी वर्षातील जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागात उच्च शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल सुभाष सारडा यांना गंगाई बाबाजी शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.डाव्या विचारसरणीची चळवळ अविरतपणे सुरू ठेवणाऱ्या आणि अन्यायाच्या विरोधात धावून जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुशीलाताई मोराळे यांना गंगाई बाबाजी आदर्श समाज सेविका राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
धार्मिक क्षेत्र
------------
धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानासाठी ह.भ.प.सखाराम जाधव महाराज,ह.भ.प. सायली राऊत महाराज, ह.भ.प. मनोहर पोतदार महाराज (आष्टी), ह.भ.प.श्रीमती पुष्पाताई जगताप महाराज (तवलवाडी), ह.भ.प.श्रीमती हरुअक्का मेहत्रे महाराज (देविनिमगाव), ह.भ.प.राजेंद्र लोखंडे महाराज (पाटोदा),ह.भ.प. काशीनाथ महाराज (गणेशगड नागतळा ), ह.भ.प.अशोक भोसले महाराज (पारगाव) यांची निवड करण्यात आली आहे.
क्रीडा पुरस्कार
--------------
क्रीडा क्षेत्रात बाळासाहेब शेंदुरकर, राहुल जाधव,
बबन काशीद यांचा समावेश आहे.
उच्च शिक्षण क्षेत्र
----------------
रयत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव मस्के,सुभाष सारडा बीड,डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी,डॉ.
वसंत माळी (उल्हासनगर मुंबई), प्रा.एन.एन. साबळे (बीड), प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे
(बनसारोळा) यांचा सन्मान होणार आहे.
शैक्षणिक विभाग
--------------
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्र विभागातून अर्जुन घुगे,बारामते तुकाराम,कल्याण वाल्हेकर,संजय सोले,
रघुनाथ गोल्हार,रवींद्र फुंदे, श्यामसुंदर घाडगे, मुकुंद लगड,सुहास साळवे,पद्माकर गर्जे,श्रीमती नीता आघाव,राजू






















सानप, भानुदास आवळे, सुजाता जाधव, अशोक इथापे,प्रा. अजित इथापे,
श्रीमती शेख मिनाज,पद्माकर गर्जे,श्रीमती चंद्रकला लाड, श्रीमती घाटोळे सारिका, सुर्यभान
परमेश्वर गटकळ,
सुरेश तळेकर, आत्माराम
बारवकार.
उद्योजक विभाग
-------------
रमेश गुगळे (जामखेड),एन.बी. धुमाळ,मांडवा, बाळासाहेब भुकन
विजयसेठ कोठारी
(जामखेड),
प्राणी मित्र
-----------
रणजीत राऊत ( जामखेड)
पत्रकारिता क्षेत्र
--------------
जावेद पठाण
(आष्टी), संतोष सानप (आष्टी), अशोक शिंदे (शिरुर),हरीदास शेलार,अजय जोशी
शितलकुमार मोटे,
सुरेश जाधव, आण्णासाहेब साबळे,गहिनीनाथ पाचबैल
सचिन होळकर,
कृषी विभाग
-----------
सचिन होळकर (लासलगाव),
शहाजी गुलाबराव भोसले,प्रा.
दत्तात्रय ढवळे सुरेश धोंडीबा डाके, दत्तात्रय हिरवे (श्रीगोंदा) यांचा गौरव करण्यात येणार आहे.
सामाजिक क्षेत्र
---------------
सामाजिक कार्यासाठी गणेश
अंबेकर (आष्टी), रावसाहेब पिंपळे (एकलव्य संघटना बीड),विजय दत्तू राजपूते,प्रविण आटोळे (वाहिरा), श्रीमती वर्षा शेरकर, समीर शेख (पाटण सांगवी), सय्यद रहमान (कडा), महादेव भवर, सुखदेव पोकळे (आष्टी) माजी सैनिक रणजित चव्हाण (पिंपरखेड) यांचा समावेश आहे.
आदर्श माता–पिता
पुरस्कार
-----------------
आदर्श कुटुंब मूल्यांसाठी श्री व सौ.वैशाली भीमराव भोसले व श्री व सौ.मंजिरी सुरेश पंडित (कडा -पुणे), श्री व सौ. सायरा सलीम शेख यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
कला क्षेत्र
------------
कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौतम खंडागळे (शेरी),श्रीरंग बोराडे (पुणे),अनिल बेद्रे (आष्टी) यांची निवड करण्यात आली आहे.
आदर्श गोपालक
---------------
पशुपालन व गोसंवर्धन क्षेत्रात कार्यरत गजानन कुलकर्णी (देवळाली) यांना आदर्श गोपालक पुरस्कार देण्यात येणार आहे.
साहित्य क्षेत्र
-------------
साहित्य क्षेत्रात योगदानासाठी राम निकम (सेलू, परभणी),बाबाराव मुसळे (वाशीम बुलढाणा), भागवत ससाणे (अंबाजोगाई),प्रा. डॉ.प्रल्हाद लुलेकर (छत्रपती संभाजीनगर) यांचा गौरव होणार आहे.
आदर्श वकील
---------------
कायदा क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी ॲड.बाबुराव अनारसे (आष्टी) ॲड.दत्तात्रय सयाजी ससाणे यांची निवड करण्यात आली आहे.
आदर्श सरपंच
--------------
ग्रामविकासासाठी दत्ता काकडे (सरपंच परिषद,महाराष्ट्र राज्य), ज्ञानदेव सासवडे (साकत – कोयाळ), बबीता पाडवी (नंदुरबार ), श्रीमती सुषमा
देसले (अंमळनेर जळगाव),श्रीमती सौ.वंदना परवंत गायकवाड (क-हेवडगाव) यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.
वैद्यकीय क्षेत्र
------------
आरोग्य सेवेसाठी आष्टी शहरातील प्रसिद्ध डॉ.विलास सोनवणे,डॉ.राहुल टेकाडे, डॉ.सचिन चाळक (आष्टी) यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.हे पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दि.१ जानेवारी २०२६ रोजी आष्टी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
------------------
गंगाई- बाबाजी रौप्य महोत्सवाची उत्सुकता शिगेला..
-----------------
सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री हेमांगी कवी यांच्या हस्ते २९ डिसेंबरला होणार उद्घाटन
-------------------
आष्टी येथील शेतकरी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आ. भीमराव धोंडे यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ भगवान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित २५ व्या.गंगाई बाबाजी रौप्य कला महोत्सवाचे उद्घाटन सोमवार दि.२९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा.आष्टी येथील भगवान महाविद्यालयात सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माजी आ. भीमराव धोंडे हे राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी दिली. आष्टी येथे संपन्न होणाऱ्या या गंगाई -बाबाजी रोप्य महोत्सवी कला महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. आष्टी शहरात ठीकठिकाणी कार्यक्रमाचे भव्य फलक लावण्यात आले आहेत.
संयोजन समितीचे
उत्कृष्ट नियोजन
-----------------
भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य दिव्य स्टेज उभारण्यात आले असून हजारो प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती संयोजन समितीने दिली.
कर्तुत्वान व्यक्तींचा
पुरस्काराने होणार सन्मान!
----------------
साहित्य,सामाजिक कार्य,जीवनगौरव, शिक्षण,पत्रकारिता, कला,क्रीडा,कृषी, अध्यात्म,शौर्य, प्राणी मित्र,आदर्श माता पिता, आदर्श अधिकारी,उद्योग,
विधी, वैद्यकीय सेवा आदि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
उपस्थित राहण्याचे प्राचार्य डॉ.वाघ यांचे आवाहन
-----------------
या कार्यक्रमास आष्टी पंचक्रोशीतील कला,साहित्य, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे, संस्थेचे संचालक डॉ.अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य दत्तात्रय वाघ व संयोजन समिती सदस्यांनी केले आहे.
---------------
0 टिप्पण्या