साडेचार वर्षापासून ग्रा.पं.चा कारभार पारदर्शक आहे ----सरपंच वंदना गायकवाड ----------------- क-हेवडगांव येथे म.ग्रा.रो.ह.यो.चे सोशल ऑडिटमध्ये अडथळा आणणाऱ्यावर कारवाई करा ....... सरपंच, ग्रामसेवक यांचे गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील क-हेवडगाव येथे दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी
कन्हेवडगांव येथे म.ग्रा.रो.ह.यो. सामाजिक अंकेशबाबत ( सोशल ऑडिट) विशेष ग्रामसभा
घेण्यात आली होती. ग्रामसभेला काही ग्रामपंचायत सदस्य तसेच गांवातील घरकुल लाभार्थी
व जलसिंचन विहीरीचे लाभार्थी उपस्थित होते.यामध्ये ग्रामसभेमध्ये म.ग्रा.रो.ह.यो.चे
अधिकारी उपस्थित होते.ते अधिकारी लाभार्थ्यांना योजनेची माहिती सांगत होते.
ग्रामसभा ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये होती.१०० पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित
होते. ग्रामसभा सुरु असताना मध्येच सांगळे यांनी ग्रामसभेत येऊन अधिकारी व सरपंच,
ग्रामसेवक मॅडम व रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांना आरेरावीची भाषा
केली.तेथे असलेले अधिकारी यांनी या व्यक्तीला सांगितले की,आम्ही लोकांना
म.ग्रा.रो.ह. योजने विषयी माहिती देत आहोत.त्यावर त्याने ग्रामसभेत गोंधळ घातला एक
तासभर अधिकरी त्याला सांगत होते.लोकांचे कामे होऊ द्या, आपण नंतर बोलू, बरेच
नागरिकांनी त्याला विनंती केली. आमचे कामे होऊ दे, मध्येच ग्रामसभेला आडथळा निर्माण
का करतो ? त्यावर तो ऐकण्यास तयार नव्हता.त्याने ग्रामसभेत गोंधळ घातल्यामुळे
लोकांचे कामे राहिलेले आहेत.तो आणि गावातील काही पाच ते सहा लोक नेहमीच आम्ही महिला
असल्यामुळे आम्हाला वारंवार फोन करून परेषाण करतात,ब्लॅकमेलींग करतात.त्याच्यावर
योग्य ती कारवाई करण्यात यावी. गेली साडेचार वर्षापासून ग्रामपंचायतचा कारभार हा
पारदर्शकपणे सुरु आहे.आम्ही कोणाचीही कधीही आडवणूक केलेली नाही.आमच्यावर हे लोक
खोटे आरोप करतात. ग्रामपंचायतच्या चांगल्या विकास कामात ते बाधा आणतात. क-हेवडगांव
येथील त्रास देणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावा अशी महिला सरपंच व
महिला ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. या निवेदनाच्या
प्रती आ.सुरेश धस, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बीड यांना देण्यात आल्या आहेत
0 टिप्पण्या