
आष्टी ( प्रतिनिधी ) मराठा सेवा संघ प्रणीत तानुबाई बिरजे पत्रकार परिषद आष्टी
यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जिजाऊ
माँसाहेब आदर्श संपादक पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षीचा हा मानाचा पुरस्कार
आष्टी येथील संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांना जाहीर झाला असल्याची
माहिती ज्येष्ठ पत्रकार सीताराम पोकळे यांनी दिली. पत्रकारिता क्षेत्रातील
त्यांच्या सातत्यपूर्ण ३५ वर्षाच्या आणि प्रभावी कार्याची दखल घेऊन त्यांची या
पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. उत्तम बोडखे यांच्या निवडीबद्दल आष्टी तालुका
पत्रकार संघ, सुप्रभात ग्रुप व मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.उत्तम बोडखे
यांना मागील काही वर्षांत त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध संस्थांच्या
माध्यमातून अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल
अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पत्रकारितेत ३५ वर्षे पूर्ण करणारे
ध्येयवादी व्यक्तिमत्व
---------------
उत्तम बोडखे हे आलेल्या संकटांवर मात करुन
यशस्वी झाले आहेत ते यशस्वी होण्याचे मुख्य कारण जर कोणते असेल तर जात,धर्म,पंथ
यांच्या पलीकडे जावून सर्व समाजातील मित्र परिवारास केलेली मदत होय.आपण एका
दैनिकाचे उपसंपादक म्हणून कधीच वागले नाहीत.एक मित्र म्हणून आपण सर्वांशी चांगले
संबंध प्रस्थापित केलेले आहेत.उत्तमराव हे उपप्राचार्य अनंत हंबर्डे यांचे लाडके
विद्यार्थी.हंबर्डे सरांनी त्याना घडविले. उत्तम बोडखे महाविद्यालयीन जीवनापासून
बातम्या,लेख लिहिण्यात "इंटरेस्टफुल" असायचे.लेख, बातम्यांच्या निमित्ताने राजकीय
मंडळींशी त्यांची उठबस वाढली. कॉलेज जीवना पासूनच 'वार्ताहर' पदाची त्यांना आवड
असल्यामुळे ते त्यांनी स्वीकारले.पुढे बी.जे.ही वृत्तपत्रशास्त्र पदवी संपादन
केल्यानंतर 'आष्टी वार्ताहर' हे साप्ताहिक त्यांनी सुरू केले.ते एक शेतकरी
कुटुंबातील असल्यामुळे घरची परिस्थिती साधारणच होती.परंतु त्यांच्या अंगी असलेला
गुण म्हणजे जिद्द व चिकाटी,मेहनत करण्याची तयारी यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने
शून्यातून विश्व निर्माण केले.आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील
जनतेला, उपेक्षित समाजाला न्याय मिळवून दिला.गेली ३५ वर्षे निर्भिडपणे पत्रकारिता
करून हा ध्येयवादी स्वाभिमानी आणि कोणापुढे झुकला नाही याचा सार्थ अभिमान आहे.आजही
ते प्रामाणिकपणे " मेहनत " घेऊन मित्रांना तेवढाच वेळ देतात व वाचन, मनन,चिंतन करून
बातम्या पाठविणे ही साधना नवीन बातमीदारांनी त्यांच्याकडून शिकावी.उत्तम बोडखे
यांची साधना " तोंडात बोट " घालण्यासारखी आहे. ती म्हणजे दररोज बातम्या
लिहिण्यासाठी त्यांची नित्त्याची बैठक,आजही मित्रांसाठी, कुटुंबासाठी, नातवांसाठी,
सर्वसामान्य जनतेसाठी तेवढाच वेळ देतात. हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.खऱ्या
अर्थाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची ओळख उत्तम बोडखेमुळे अष्टीकरांना
झाली.खेड्यातून येऊन एक उमदा तरुण आपल्या जिद्द व चिकाटीने माणसाच्या मना-मनात घर
करतो हे विचार करण्यासारखे आहे. उत्तमराव यांना सहज नोकरी लागत होती परंतु
प्रामाणिक पत्रकारितेत त्यांनी करिअर घडविले. त्यांची बातम्या लिहिण्याची आवड,
जिद्द व चिकाटीच्या जोरावर " दैनिक झुंजारनेता या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून काम
करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीच उत्तम ने सोनं केलं. भीमराव धोंडेसाहेब
यांचा विश्वास संपादन करून राजाश्रय मिळवला.तेव्हापासून आजपर्यंत उत्तम बोडखे यांनी
मागे वळून पाहिलेच नाही.पत्रकारिता क्षेत्रात अनेक शिखरे पादाक्रांत केली.
साहित्य,संस्कृती, कला,क्रीडा,कृषी, अध्यात्म, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात लिखाण
करून लोकशाहीचा चौथा स्तंभ काय असतो हे तालुक्याला, आष्टीकरांना दाखवून दिले.एक
निर्भिड पत्रकार म्हणून त्यांची बीड जिल्ह्यावर ओळख आहे. आष्टी तालुक्याच्या
राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक आणि शैक्षणिक या सर्व क्षेत्रातील बातम्यांमुळे उत्तम
बोडखे यांना झुंजारनेता सारख्या दर्जेदार, अग्रणी दैनिक वर्तमानपत्रांमध्ये "
उपसंपादक " पदी काम करण्याची संधी मिळालेली आहे.तीच त्यांच्या कामाची पावती होय.
-----------------
0 टिप्पण्या