Ticker

6/recent/ticker-posts

एम.एस.अर्थोसाठी डॉ.विवेक विजय पोकळे यांची निवड

आष्टी (प्रतिनिधी) अहिल्यानगर येथील रेसिडेन्सीयल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य तथा आष्टी तालुक्यातील चिंचाळ्याचे सुपुत्र विजय पोकळे यांचे चिरंजीव डॉ.विवेक विजय पोकळे यांची नुकतीच बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे एम.एस.अर्थो या उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.डॉ.विवेक पोकळे यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे आष्टी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तर पाचवी ते बारावीपर्यंत अहिल्यानगर येथील रेसिडेन्सीयल हायस्कूल मध्ये शिक्षण झाले आहे. एमबीबीएसचे शिक्षण ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथे पूर्ण झाले आहे.डॉ.विवेकच्या या निवडीबद्दल आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे,माजी आ.साहेबराव दरेकर,माजी आ. बाळासाहेब आजबे, किशोरनाना हंबर्डे,अश्रूबा मुटकुळे,प्रा.सय्यद आल्लाऊद्दीन,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,चिंचाळाचे सरपंच पंडित पोकळे,माजी सरपंच अशोक पोकळे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या