
आष्टी येथील शेतकरी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व आष्टीचे माजी आ.भीमराव धोंडे यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ भगवान महाविद्यालयाच्यावतीने आयोजित २५ व्या.गंगाई बाबाजी रौप्य कला महोत्सवाचे उद्घाटन सोमवार दि.२९ डिसेंबर रोजी दुपारी आष्टी येथील भगवान महाविद्यालयात सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माजी आ. भीमराव धोंडे हे राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी दिली. साहित्य,सामाजिक कार्य, जीवनगौरव,शिक्षण, पत्रकारिता,कला,क्रीडा, कृषी,अध्यात्म,शौर्य,प्राणी मित्र,आदर्श माता पिता,आदर्श अधिकारी,उद्योग,विधी वैद्यकीय सेवा आदि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आष्टी पंचक्रोशीतील कला, साहित्य,रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे,संस्थेचे संचालक डॉ.अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे,संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य दत्तात्रय वाघ, उपप्राचार्य प्रा.डॉ.ज्ञानदेव वैद्य,उपप्राचार्य प्रा.डॉ.आप्पासाहेब टाळके, प्राचार्य सुरेश बोडखे,प्राचार्य
डॉ.बाळासाहेब खेमगर, मुख्याध्यापक संतोष थोरवे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत, प्राचार्य डॉ.उमाकांत बनाळे, प्राचार्य एस.जी.निशिगंध, प्रा.डॉ बाळासाहेब गावडे,प्रा.डॉ. दिगंबर पाटील,संयोजन समिती सदस्यांनी केले आहे.
------------
'अस्पृश्यता हे एक शाप आहे याची जाणीव ठेवून गेल्या अनेक दशकापासून शूर वीर विचारवंत आणि तत्ववेत्यांनी आपल्या साहित्यातून लेखणीतून प्रखर विचारांनी क्रांतीचा जयघोष केला विचारवंत, साहित्यिक, कवी आणि शाहिरांनी अंगावर शहारे आणणारे गीत रचना, नाट्य आणि शाहिरीतून परिवर्तनाची हाक दिली आणि याच शाहिरी परंपरेमध्ये आजही आधुनिक युगात परिवर्तनासाठी हृदयापासून हाक देत क्रांतीची चेतना बनणाऱ्या शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या कार्याची महती थेट महाराष्ट्राच्या क्षितिजापर्यंत पोहोचली आहे!
प्रत्येक माणूस सारखा आहे आणि म्हणून जात,धर्म,पंथ यामुळे कुणाचाही अवमान होऊ नये यासाठी अर्थात समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्य वेचले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सारख्या महापुरुषांनी आयुष्य समतेसाठी अर्पण केले. त्यांच्याच विचारांची पेरणी वर्तमानात करून भविष्यकाळ उज्वल व्हावा यासाठी धडपडणाऱ्या शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी यांच्या शाहिरीला आज प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.उपेक्षित वर्गाला न्याय मिळावा यातून देश उभारावा ही व्यापक विचारसरणी ठेवून पुरोगामी चळवळीची ज्वाला शाहीरीतून जागृत ठेवण्याचे मौलिक आणि दैदिप्यमान कार्य यांच्या माध्यमातून होतेय, ही अत्यंत जमेची बाजू आहे. समता आणि समरसतेतून या भूमिकेतून वामनदादा कर्डक यांनी जागृती करण्याचा प्रयत्न केला हाच समृद्ध वारसा पुढे नेण्याचे काम शाहीर करत आहेत म्हणूनच शाहिरी हे एक प्रभावी माध्यम म्हणून प्राचीन मध्ययुगीन आणि आजच्या वर्तमान काळात ही यशस्वी होत आहे. " हो कही भी आग, आग जलने चाहिये!" ही सामंजस्याची भूमिका घेत शाहीर समतेचा वारसा पुढे नेत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते, माझे दहा भाषणे आणि एक शायरी बरोबर आहे. अस्पृश्यता एक शाप असल्याची जाणीव ठेवून जातीअंताची लढाई लढण्यासाठी हे शाहीर सक्षम झाले आहेत.महान विचारवंतांना गमावावे लागण्याची खंत व्यक्त करतानाच शाहीर शीतल साठे यांनी महात्मा फुले,गांधीजींच्या कर्तुत्वाचा उल्लेख करत सत्यासाठी या झगडलेल्या नेत्यांचे विचार पुढे नेणाऱ्या दाभोळकर,पानसरे आणि कलबुर्गीच्या आहोतिचा अत्यंत जड अंतकरणाने उल्लेख केला.
समतेचा रथ पुढे जाणारच! ही प्रेरणा शहरांनी लेखणीतून आणि वाणीतून दिली आहे. धर्माच्या गारद्याना इशारा देत त्यांनी "धर्माच्या गारद्यांनो,कशी रोखणार गती..? या गीतातून चोख उत्तर आणि प्रश्नही विचारला आहे. आठवा तुकोबाची गाथा यावर भाष्य करताना प्रज्ञासूर्य भीमरावांच्या मनुस्मृती जाळण्याचे वास्तवावरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.शाहिरीतून परखडपणे त्यांनी समतेचे गाणे गायले आहे. तुम्ही उजेडाची फुले किती खुडली सांगा? असा संताप व्यक्त करत अज्ञानाचा एक दिवस अंत होईल आणि उजेडाचा.. समतेचे गाणे गाणारे पुढे येतील हा विश्वास देत दुसरीकडे समतेचे गाणे गाणारे आत कसे? असा अंतर्मुख करणारा प्रश्नही पुन्हा विचारला आहे.शाहिरीतून बाबासाहेबांनी ऊर्जा निर्माण केली हे सांगताना त्यांनी तुकारामांची गाथा पुन्हा बुडतेय याची वास्तवातील काळजी करणारी भीती व्यक्त केली.
चौकट
--------
"हो कही भी आग,
आग जलनी चाहिये!"
-------------------
सत्यासाठी समतेसाठी जगणाऱ्या क्रांतिकारी शाहिरांच्या शाहिरीतून परिवर्तनाची हक्क देणाऱ्या सुप्रसिद्ध शाहीर शितल साठे यांनी धर्माच्या गारद्याना गती कशी रोखणार? असा प्रश्न विचारला आहे आणि जातीअंताची लढाई आपण जिंकून दाखवूया असा आत्मविश्वास ही त्यांनी समतेची लढाई लढणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना दिला आहे.
समता आणू समरसतेतून..
---------------------
शाहीर शीतल साठे यांनी उपेक्षित वर्गाला न्याय मिळावा यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाव वाड्यावर परिवर्तनाची हाक दिली. परिवर्तनातच्या या प्रवासात पुरोगामी चळवळीचा ज्वाला शहरातून जागृत ठेवण्याचे कार्य त्यांचे सुरू आहे.या त्यांच्या महान कार्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
---उत्तम बोडखे, आष्टी
----------------
0 टिप्पण्या