Ticker

6/recent/ticker-posts

योग्य ऊस व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि महेश सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने हा मेळावा शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार ---विठ्ठल भापकर ----------------- अति पाणी,अति खतामुळे उत्पादन वाढत नाही,उलट नुकसान होते.योग्य व्यवस्थापन हाच यशाचा मंत्र --- नवनाथ गायकवाड --------------- योग्य नियोजन,आधुनिक तंत्रज्ञान आणि सहकाराच्या माध्यमातून ऊस शेती पुन्हा नक्कीच फायदेशीर ठरेल ---माजी आ. भीमराव धोंडे ---------------- महेश साखर कारखान्यावरील ऊस व्यवस्थापन मार्गदर्शन मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आष्टी (प्रतिनिधी) ऊस शेती व साखर उद्योगाच्या सद्यस्थितीवर सविस्तर मत व्यक्त करीत आज या भागातील शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहे. मात्र योग्य नियोजन,आधुनिक तंत्रज्ञान आणि सहकाराच्या माध्यमातून ऊस शेती पुन्हा नक्कीच फायदेशीर ठरू शकेल.आष्टी तालुक्यासह तीन जिल्हे व सात तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड होत आहे. कुकडी,उजनी व इतर जलस्रोतांमुळे पाण्याची उपलब्धता वाढली आहे. ऊस शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.महेश सहकारी साखर कारखाना सुरू झाला तर या परिसरातील हजारो शेतकरी,मजूर ,वाहतूकदार व व्यावसायिकांना रोजगार मिळेल आणि संपूर्ण तालुक्याची आर्थिक घडी मजबूत होईल असा विश्वास माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगत योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सहकाराच्या माध्यमातून ऊस शेती पुन्हा नक्कीच फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन माजी आ. भीमराव धोंडे यांनी केले. आष्टी तालुक्यातील जळगाव येथील महेश सह.साखर कारखाना लि.यांच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य ऊस व्यवस्थापन या विषयावर भव्य मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.आष्टी, पाटोदा,शिरूर कासार,जामखेड,कर्जत तसेच परिसरातील विविध तालुक्यांमधून शेकडो ऊस उत्पादक शेतकरी या मेळाव्यास मोठ्या उत्साहात उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकात शिवाजी थोरवे यांनी महेश सहकारी साखर कारखान्याचा इतिहास,आजपर्यंतची वाटचाल व आगामी उद्दिष्टे याविषयी माहिती दिली.सन १९७४ मध्ये स्थापन झालेला हा कारखाना दुष्काळ, आर्थिक अडचणी, बँक कर्ज,भाडेपट्टी यांसारख्या अनेक संकटांतून मार्ग काढत आज नव्या टप्प्यावर पोहोचत असल्याचे थोरवे यांनी सांगितले.दीर्घकाळ अडचणीत असलेला महेश सहकारी साखर कारखाना पुन्हा कार्यान्वित होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने या मेळाव्याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष लागले होते. याबाबत या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. महेश कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ऊस शेतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे माजी आ. भीमराव धोंडे यांनी सांगीतले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आ.भीमराव धोंडे यांनी ऊस शेती व साखर उद्योगाच्या सद्यस्थितीवर सविस्तर आणि परखड भाष्य केले.ते म्हणाले,आज शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहे. आष्टी तालुक्यातील सर्व माजी आमदार यांनी हा सगळा कारखाना वाचवण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे अशा अपेक्षा व्यक्त केली. कमी खर्चात अधिक उत्पादनाचे सूत्र ----नवनाथ गायकवाड ---------------- या मेळाव्यात ऊस तंत्रज्ञान तज्ज्ञ नवनाथ नाना गायकवाड यांनी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने ऊस शेती करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.ते म्हणाले,ऊस उत्पादन वाढवायचे असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.योग्य अंतर, संतुलित खत व्यवस्थापन,ठिबक सिंचनाचा वापर आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येते.तसेच बीज प्रक्रिया, जमिनीच्या चाचणीनुसार खतांचा वापर,सेंद्रिय खतांचा समावेश, रोग व किडींचे वेळीच नियंत्रण या बाबींवर त्यांनी सविस्तर माहिती दिली.अति पाणी आणि अति खतामुळे उत्पादन वाढत नाही,उलट नुकसान होते. योग्य व्यवस्थापन हाच यशाचा मंत्र आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.यावेळी II Care Foundation चे सी.ओ.ओ.विठ्ठल भापकर यांनी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल साधने व प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येत असल्याचे भापकर यांनी सांगितले. यावेळी ऊस व्यवस्थापनासंबंधी माहितीपर व्हिडिओ सादरीकरणही दाखविण्यात आले.शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या मार्गदर्शन मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंका दूर करून घेतल्या.योग्य ऊस व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि महेश सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने हा मेळावा शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.उपस्थित मान्यवर या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आ.भीमराव धोंडे, विठ्ठल भापकर (सी.ओ.ओ.,II Care Foundation), नवनाथ गायकवाड (ऊस तंत्रज्ञान मार्गदर्शक) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी युवा नेते डॉ.अजयदादा धोंडे,चेअरमन राजेंद्र धोंडे,युवा नेते अभयराजे धोंडे,ह.भ.प.पांडुरंग महाराज, निळकंठ तावरे महाराज, बारगजे महाराज,विश्वनाथ राऊत, धैर्यशील थोरवे,नियामत बेग,हनुमंत थोरवे,सावता ससाणे, भाऊसाहेब लटपटे,अंकुश मुंडे, बाळासाहेब पवार, डॉ.पंढरीनाथ गोरे, विजयशेठ कोठारी,सतीशमामा झगडे, बाळासाहेब वाघुले, संतोषभैय्या चव्हाण, बजरंग कर्डिले, शांतीलाल रेपाटे, माऊली गदादे,ताराचंद कानडे, दादा जगताप, नानाभाऊ वाडेकर, बबन आवटे,बबन नन्नवरे, राजाराम नन्नवरे,शेख ए.जे., उत्तम बोडखे.पी.बी. बोडखे,कुंडलिक आस्वर, सोनाजी गांजुरे,राम बोडखे, भागवत बोडखे, हरिभाऊ जंजिरे, दिलीप मस्के फौजी, संभाजी जगताप, सुधीर जगताप, जनार्दन कंठाळे, विठ्ठल डोंगर,संजय धायगुडे, चेअरमन दादासाहेब हजारे, पुस्ताक पानसरे, माजी सभापती गौतम सावंत,हरी पाटील बोडखे,बबनराव काकडे,तात्यासाहेब कदम, संजय चंदनशिव,राधाकिसन शिरसाठ,अनिल पाटील,परमेश्वर धुमाळ,दिलीप काळे,एन.डी. पवळ, सदा पाटील दिंडे, भिमराव आहेर, सुभाष राऊत, आबासाहेब तावरे, सुरेश राख,उमेश बन,श्याम सांगळे, आज्जुभाई शेख, शिवाजी चौधरी, शिवाजी कोल्हे, आजिनाथ बेलेकर, बाबा ससाने, गौतम ससाने,भोनीनाथ बांगर,नामदेव विधाते, स्वामी सानप, दत्तोबा शिंदे, विठ्ठल लांडगे, अरुण सायकड, दादासाहेब झांजे,अॅड.संभाजी दहातोंडे,अॅड.ढाकणे, बजरंग कर्डिले, यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी बांधव,जि.प.सदस्य, पं.सं. सदस्य, सरपंच,उपसरपंच, पत्रकार बांधव, ग्रामस्थ तसेच कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विनोद ढोबळे, निलेश दिवटे यांनी तर उपस्थितांचे आभार पांडुरंग नागरगोजे यांनी मानले. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या