Ticker

6/recent/ticker-posts

२० तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या,पुढची पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ......... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आष्टी ( प्रतिनिधी ) पाथर्डीच्या विकासासाठी कमळाची ग्वाही आहे.पाथर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे भाजपा उमेदवार अभय आव्हाड व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, पुढची पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ असे आवाहन केले. प्रचंड प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या तयार होत होती परंतु आ. मोनिकाताई राजळे यांनी आवश्यक गोष्टींची पूर्तता करून शेवगाव आणि पाथर्डीसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून घेतली आणि ही योजना जवळपास ७० टक्के पूर्ण झाली आहे. या शहरांसाठी २२० कोटींची भुयारी गटार योजना देखील सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी दिलेल्या 'हर घर जल' च्या मंत्राला अनुसरून पाथर्डीच्या घरोघरी पाण्याचा नळ असेल यादिशेने काम करत आहोत.त्यामुळे शेवगाव आणि पाथर्डी मधील जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि आरोग्याच्या दृष्टीने ते निरोगी राहतील . पाथर्डी येथील नवीन शासकीय न्यायालयाच्या इमारतीचे काम लवकरच सुरु होणार आहे.आ. मोनिकाताई राजळे यांच्या प्रयत्नाने अनेक शासकीय इमारतींचे काम उत्तम प्रकारे पूर्ण झाले आहे.त्यामुळे शहर विकासासाठी त्यांच्या ज्या ज्या संकल्पना असतील, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. पाथर्डीच्या जनतेने २० तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या,पुढची पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी ना. राधाकृष्ण विखे,आ. मोनिकाताई राजळे, आ. सुरेश धस उपस्थित होते --------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या