Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीतील गंगाई- बाबाजी रौप्य महोत्सवाचे सिनेअभिनेत्री हेमांगी कवी यांच्या हस्ते २९ डिसेंबर रोजी उद्घाटन

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी येथील शेतकरी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे माजी आ. भीमराव धोंडे यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ भगवान महाविद्यालयाच्या वतीने आयोजित २५ व्या.गंगाई बाबाजी रौप्य कला महोत्सवाचे उद्घाटन सोमवार दि.२९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा.आष्टी येथील भगवान महाविद्यालयात सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माजी आ.भीमराव धोंडे हे राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ यांनी दिली. आष्टी येथे संपन्न होणाऱ्या या गंगाई -बाबाजी रौप्य महोत्सवी कला महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे.आष्टी शहरात ठीकठिकाणी कार्यक्रमाचे भव्य फलक लावण्यात आले आहेत. भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य दिव्य स्टेज उभारण्यात आले असून हजारो प्रेक्षकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती संयोजन समितीने दिली.साहित्य, सामाजिक कार्य, जीवनगौरव, शिक्षण,पत्रकारिता, कला,क्रीडा, कृषी, अध्यात्म,शौर्य,प्राणी मित्र, आदर्श माता पिता,आदर्श अधिकारी, उद्योग,विधी वैद्यकीय सेवा आदि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गंगाई बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास आष्टी पंचक्रोशीतील कला, साहित्य,रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे, संस्थेचे संचालक डॉ.अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे,संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य दत्तात्रय वाघ,उपप्राचार्य प्रा.डॉ. ज्ञानदेव वैद्य,उपप्राचार्य प्रा.डॉ. आप्पासाहेब टाळके, प्राचार्य सुरेश बोडखे,प्राचार्य डॉ.बाळासाहेब खेमगर, मुख्याध्यापक संतोष थोरवे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत, (मुख्याध्यापक), प्राचार्य डॉ.उमाकांत बनाळे,प्राचार्य एस. जी.निशिगंध,प्रा.डॉ. बाळासाहेब गावडे,प्रा.डॉ.दिगंबर पाटील,संयोजन समिती सदस्यांनी केले आहे.
-----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या